१३ वर्षानंतर श्रीमंत महापालिकेला जाग! मतदारांच्या माहितीसाठी ‘व्हाॅट्सअप चॅट बॉट’ सुविधा? शेलारांचा सवाल

88

मुंबई पालिकेने अलिकडेच व्हाॅट्सअप चॅट बॉट या नव्या उपक्रमास सुरुवात केली आहे. या उपक्रमामुळे बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे देण्यात येणाऱ्या विविध ८० पेक्षा अधिक सेवा-सुविधांची माहिती नागरिकांना त्यांच्या मोबाईलवर ८९९९-२२-८९९९ या व्हॉट्सअप क्रमांकाद्वारे अत्यंत सहजपणे उपलब्ध होणार आहेत. पालिकेच्या या उपक्रमावर भाजपचे आमदार अँड आशिष शेलार यांनी ट्विट करत टीका केली आहे. व्हॉट्सॲपला १३ वर्षे झाल्यावर पालिकेला जाग आली निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांची माहिती गोळा करण्यासाठी पालिकेने ही सुविधा सुरू केली. एसटीचे प्रश्न सोडवण्यासाठी जे आझाद मैदानावर जात नाहीत ते व्हाॅट्सअप चॅट बॉट वरून मुंबईकरांचे प्रश्न कसे सोडवणार असा सवालही आशिष शेलार यांनी केला आहे.

काय म्हणाले शेलार? 

“व्हॉट्सअपची निर्मिती २००९ साली झाली, म्हणजे व्हॉट्सॲपला १३ वर्षे झाल्यावर आमच्या सर्वात श्रीमंत मुंबई महापालिकेला जाग आली आणि सत्ताधाऱ्यांनी “व्हाॅट्सअप चॅट बॉट” नामक प्रणाली वाजतगाजत आणली! पालिकेने नियुक्ती न दिल्याने आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्यांकडे जे जात नाहीत ते “व्हाॅट्सअप चॅट बॉट” वरुन मुंबईकरांचे प्रश्न कसे सोडवणार?” असा सवाल करत शेलारांनी, आगामी महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांची माहिती गोळा करण्यासाठी पालिकेने ही सुविधा सुरू केली अशी टीका सत्ताधाऱ्यांवर केली आहे.

( हेही वाचा : दिलासा! राज्यातील मृत्यूदर खालावतोय… )

व्हाॅट्सअप चॅट बॉट

या सुविधेमुळे ८० पेक्षा अधिक सेवा सुविधा नागरिकांना हातातील मोबाईलवर पालिकेच्या सर्व सुविधा मिळतील, काही सेकंदात नागरिकांच्या प्रश्नाचे निवारण होईल. देशातला असा हा पहिलाच उपक्रम आहे. असे मुंबई महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.