MLA Disqualification Case : आमदार अपात्रतेच्या संभाव्य निकालावर काय म्हणाले शरद पवार-उद्धव ठाकरे ?

245

बुधवार, १० जानेवारी रोजी शिवसेना आमदार अपात्रतेच्या (MLA Disqualification Case) मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निर्णय देणार आहेत. त्याआधीच त्यावर टीका टिप्पणी होऊ लागली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी यावर टीका केली आहे.

काय म्हणाले शरद पवार? 

निकालाच्या आधी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांनी यावर आक्षेप घेत ज्यांच्याकडून निकालाची अपेक्षा आहे त्यांनी ज्यांच्यावर सुनावणी सुरू आहे त्यांची भेट घेणे हे संशयास्पद आहे असे शरद पवार म्हणाले. ज्यांच्यापुढे प्रकरण आहे आणि ज्यांची केस आहे. ती केस मांडणे चुकीचे नाही. परंतु ज्यांच्यासमोर केस मांडली आहे आणि ज्यांच्याकडून निकाल अपेक्षित आहे. त्यांनी ज्यांची केस आहे  त्यांच्याकडे जात असतील तर संशयाला चिंता वाटावी अशी परिस्थिती निर्माण होते. हे केले नसते तर या पदाची प्रतिष्ठा आणखी चांगली राहिली असती, असेही शरद पवार म्हणाले. हा खटला वैयक्तिक नसून देशात पुढे लोकशाही राहणार आहे की नाही. हे दोघे मिळून लोकशाहीचा खून करणार आहेत हे उद्याच्या निर्णयावरून कळेल, असे शरद पवार म्हणाले.

(हेही वाचा CM Eknath Shinde : शिवसेनाप्रमुख जिवंत असते, तर त्यांनी मोदींना शाबासकी दिली असती)

काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

मी मुख्यमंत्री होतो. कधीही विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांकडे जात नाही तर अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना बोलावून घेऊ शकतात. परंतु हे दोघे फक्त मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष नाहीत. एक न्यायाधीश आहे तर दुसरे आरोपी आहेत. मग न्यायाधीश ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना भेटू शकतात का? यातून संशय येतो की या दोघांची मिलीभगत तर नाही ना..असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. दरम्यान, आम्ही सर्वोच्च न्यायालयासमोर प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. त्यात एकदा नव्हे तर दोनदा मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष यांची भेट झाली हे सांगितले आहे. जनतेच्या कोर्टात आम्ही जातोय. जनतेचा अधिकार कुणी हिसकावून घेऊ शकत नाही. मागील २ वर्षापासून हा खटला चालतोय. काहीही आवश्यकता नव्हती. सरळ सरळ यात सर्वकाही स्पष्ट आहे. घटनातज्ज्ञांची प्रतिक्रिया जनतेने पाहावी. इतका वेळ यात बर्बाद झाला. बेकायदेशीर सरकारच्या हातात राज्याचे भवितव्य आहेत हे धोक्याचे आहे. उद्या काय होणार याबाबत निकालातून दिसेल असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.