West Bengal : पश्चिम बंगाल पंचायत निवडणुकीत ‘खूनी खेला’; 4 तासांत 18 हत्या

239

पश्चिम बंगालमध्ये शनिवारी पंचायत निवडणुकीसाठी मतदान झाले. सायंकाळी 5 वाजेपर्यंत येथे 66.28 टक्के मतदान झाल्याचे राज्य निवडणूक आयोगाने सांगितले. राज्यात हिंसाचाराच्या भीतीमुळे 1.35 लाख जवान तैनात करण्यात आले होते, त्यानंतरही मतदानादरम्यान अनेक ठिकाणी रक्तरंजित चकमकी झाल्या. यामध्ये 18 विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला.

याशिवाय अनेक ठिकाणी बूथ कॅप्चरिंग आणि मतदान केंद्रांची तोडफोड करण्यात आली. या हिंसाचारानंतर भाजपने टीएमसीला घेरले. बंगालमध्ये लोकशाहीची हत्या केल्याचा आरोप त्यांनी केला. याशिवाय निवडणूक आयुक्त राजीव सिन्हा यांच्यावरही निष्काळजीपणाचा आरोप करण्यात आला होता. राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनीही म्हटले की, बंगालमधील हत्या अस्वस्थ करणाऱ्या आहेत. त्याचवेळी टीएमसीनेही भाजपवर जोरदार प्रहार केला आहे. सध्या 11 जुलै रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

पश्चिम बंगालमध्ये पंचायत निवडणुकीदरम्यान शनिवारी एकूण 18 जणांचा मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, या हिंसाचारात टीएमसीच्या 10, भाजपचे 3, काँग्रेसचे 3 आणि सीपीआयएमच्या 2 कार्यकर्त्यांना आपला जीव गमवावा लागला. हिंसाचाराच्या या घटना मुर्शिदाबाद, कूचबिहार, पूर्व बर्दवान, मालदा आणि दक्षिण 24 परगणा येथे घडल्या.

(हेही वाचा PMLA : आता जीएसटीही मनी लाँडरिंग कायद्याच्या कक्षेत; बनावट बिल, कारचोरीवर पीएमएलए अंतर्गत होणार कारवाई)

मतदानादरम्यान ‘या’ घटना घडल्या

  • उत्तर 24 परगणामधील बराकपूरमध्ये हिंसाचार झाला. येथील मोहनपूर ग्रामपंचायतीत समाजकंटकांनी खुलेआम बंदुका दाखवत अपक्ष उमेदवाराला बेदम मारहाण केली. आवळा पीरगचा येथे अपक्ष उमेदवाराने बूथ एजंट अब्दुल्लाची हत्या केली.
  • कूचबिहारमध्ये एका तरुणाने मतपेटी लुटली. संतप्त मतदारांनी बारांचीना, दिनहाटा येथील मतदान केंद्रावरील मतपेटी पेटवली. दिनहाटा येथील इंद्रेश्वर प्राथमिक शाळेत मतपेटीत पाणी टाकल्याने मतदान पुढे ढकलण्यात आले. तुफानगंजमध्ये टीएमसी कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली. याशिवाय फोलिमारी येथे भीषण हिंसाचार झाला. मतदान केंद्रावर बॉम्ब फेकण्यात आले आणि गोळीबार करण्यात आला. त्याचवेळी भाजपचे पोलिंग एजंट माधव विश्वास यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे.
  • मालदा येथील गोपाळपूर पंचायतीच्या बलुटोला येथे काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले. त्यांनी एकमेकांवर बॉम्ब फेकले. तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवारांना लक्ष्य केल्याचा आरोप भाजपने केला आहे.

(हेही वाचा Muslim : पनवेलमध्ये मुसलमानांकडून कट्टरतेचे प्रदर्शन; रेल्वेस्थानकातच केले नमाज पठण )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.