legislative council: महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या जागांसाठी १८ जूनला मतदान, केंद्रीय निवडणूक आयोगाची घोषणा

70
legislative council: महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या जागांसाठी १८ जूनला मतदान, केंद्रीय निवडणूक आयोगाची घोषणा
legislative council: महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या जागांसाठी १८ जूनला मतदान, केंद्रीय निवडणूक आयोगाची घोषणा

legislative council: केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधान परिषदेच्या १६ जागांसाठीच्या द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी १८ जून रोजी मतदान होणार असल्याचे अधिसूचनेत (नोटिफिकेशन) म्हटले आहे.

सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर-जालना या मतदारसंघासाठी मतदान होणार आहे.

हेही वाचा – Iran US War : इराणमध्ये महिलानांही दिले जात आहे शस्त्रप्रशिक्षण; AK-47 वापरतानाचे व्हिडिओ व्हायरल

या निवडणूकीची अधिसूचना २५  मे रोजी जारी करण्यात येणार आहे. १ जून ही अर्ज भरण्याची अखेरची तारीख असेल, २ जूनपर्यंत अर्जाची छाणणी केली जाणार आहे. तर ४ जून पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. १८ जून रोजी सकाळी ८ ते सायं. ४ दरम्यान मतदान होणार आहे. २२ जूनला मतमोजणी होणार असून निकाल जाहीर होईल.

१६ आमदारांचा कार्यकाळ संपलाय
प्रशांत परिचारक, अरुणकाका बाळभीमराव जगताप, फाटक रवींद्र सदानंद, चंदूभाई व्ही. पटेल, कदम मोहनराव श्रीपती, अमरनाथ अनंतराव राजूरकर, दुष्यंत सतीश चतुर्वेदी, अनिल शिवाजीराव भोसले, डॉ. परिणय रमेश फुके, अनिकेत सुनील तटकरे, नरेंद्र इल्हिकाजी दराडे, रामदास भगवानजी आंबटकर, प्रवीण रामचंद्र पोटे, धस सुरेश रामचंद्र, विप्लव गोपीकिसन बाजोरिया, अंबादास एकनाथराव दानवे या आमदारांचटा कार्यकाळ संपला आहे.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.