Vidhan Parishad Election उमेदवारीचा ‘हायव्होल्टेज’ ड्रामा; ४८ जणांची यादी घेऊन रवींद्र चव्हाण दिल्ली वारीवर

64
Vidhan Parishad Election उमेदवारीचा ‘हायव्होल्टेज’ ड्रामा; ४८ जणांची यादी घेऊन रवींद्र चव्हाण दिल्ली वारीवर
  • प्रतिनिधी

Vidhan Parishad Election                ​राज्यातील विधानपरिषदेच्या आगामी निवडणुकीसाठी महायुतीमध्ये खलबते आणि रस्सीखेच शिगेला पोहोचली आहे. जागावाटपाचा तिढा आणि उमेदवारांची निवड करण्यासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तब्बल ४८ जणांची संभाव्य यादी घेऊन दिल्लीला रवाना झाले आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच्या बैठकीत या नावांवर शिक्कामोर्तब होणार असल्याने राजकीय वर्तुळाचे लक्ष दिल्लीकडे लागले आहे. (Vidhan Parishad Election)

​महायुतीमध्ये १२-५-२ असा जागावाटपाचा फॉर्म्युला चर्चेत असला तरी, अद्याप त्यावर अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही. भाजपाच्या वाट्याला आलेल्या १२ जागांसाठी पक्षनेतृत्वाने जोरदार तयारी सुरू केली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी १ जूनपर्यंतची मुदत असल्याने, पुढच्या दोन-तीन दिवसांत भाजपा आपल्या उमेदवारांची नावे जाहीर करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण यांचा दिल्ली दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. (Vidhan Parishad Election)

(हेही वाचा – Dombivli : मॉर्निंग वॉक करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला लुटले; दांडक्याने झोडपून सोन्याची चेन लांबविली)

​दुसरीकडे, विधानपरिषदेच्या जागावाटपावरून महायुतीत सर्वकाही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत. या विषयावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपा नेतृत्वामध्ये अनेक बैठका होऊनही तोडगा निघत नसल्याची चर्चा आहे. बैठकीनंतर बाहेर पडलेल्या उपमुख्यमंत्री शिंदे यांना पत्रकारांनी जेव्हा जागावाटपाबाबत प्रश्न विचारला, तेव्हा त्यांचा पारा चांगलाच चढला. उपमुख्यमंत्री शिंदेंचा हा संताप जागावाटपातील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आणणारा ठरला असून, महायुतीमधील अस्वस्थता स्पष्टपणे दिसून येत आहे. (Vidhan Parishad Election)

​निवडणूक कार्यक्रमानुसार १ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज भरायचे आहेत. त्यामुळे आता दिल्लीतून कोणाच्या नावाची घोषणा होते आणि जागावाटपाचा गुंता कसा सुटतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Vidhan Parishad Election)

(हेही वाचा – Cabinet Decision : सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना ३० जूनपर्यंत मुदतवाढ; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय)

​निवडणूक कार्यक्रम एक दृष्टिक्षेप :
  • ​अर्ज भरण्याची अंतिम तारीख : १ जून
  • ​अर्जाची छाननी : २ जून
  • ​अर्ज माघारीची अंतिम तारीख : ४ जून
  • ​मतदान : १८ जून (सकाळी ८ ते दुपारी ४)
  • ​मतमोजणी : २२ जून

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.