स्वातंत्र्य चळवळीतील सावरकरांचे कार्य महान! काय म्हणाले शरद पवार?

73

स्वातंत्र्यवीर सावरकर हिंदू धर्माकडे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवायचे आणि ते दलितांसाठी मंदिर प्रवेश सुधारणांना प्रोत्साहन देणाऱ्या लोकांपैकी एक होते. इतकेच नाही तर सावकरांनी स्वातंत्र्य चळवळीत जे योगदान दिलं आहे. त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी केले आहे.

सावरकरांकडून गाईचे मांस, दुधाच्या उपयुक्ततेचा पुरस्कार

सावरकरांनीच गाईचे मांस आणि दुधाच्या उपयुक्ततेचा पुरस्कार केला. ते विवेकवादी होते. ते या विषयावर शास्त्रीय पद्धतीने बोलायचे, ज्याला कमी लेखले जाऊ शकत नाही. तसेच गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सावरकरांवर होत असलेल्या विधानांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. यासंदर्भातच शरद पवार यांनी सावरकरांबाबत भाष्य केले आहे. रविवारी शरद पवार यांनी सावकरांच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा केली.

(हेही वाचा -‘साहित्य संमेलनाला खूप शुभेच्छा पण तेथे जाऊन तरी काय करायचे?’)

सावरकरांचा दृष्टीकोन वैज्ञानिक होता

यावेळी ते म्हणाले की, सावरकरांबद्दल भाजपकडून विनाकारण वाद निर्माण करण्यात आला आहे. सावरकरांनी रत्नागिरीमध्ये एक छोटं मंदिर बांधले आणि त्याच्या विधी करण्यासाठी दलित पुजारी नेमले होते. त्या काळी दलितांना मंदिरात प्रवेश दिला जात नव्हता यामुळे समाजिक समतेचा संदेश देण्यासाठी सावरकर यांनी मंदिर बांधले आणि त्याच्या विधी दलित पुजारींकडून करुन घेतली, या काही गोष्टींवरून सावरकरांचा दृष्टीकोन वैज्ञानिक होता, हे स्पष्ट होते असे पवार म्हणाले.

प्रत्येक मराठी माणसाला वीर सावरकरांचा आदर

नाशिकमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपाच्या दिवशी आपल्या भाषणात शरद पवार असेही म्हणाले की, सावरकरांचे स्वातंत्र्य चळवळीतील योगदान दुर्लक्षित करता येणार नाही, असेही पवार म्हणाले. महाराष्ट्रात प्रत्येक मराठी माणूस त्यांचा आदर करतो. दरम्यान, साहित्य संमेलनात सावरकरांचा उल्लेख न केल्यामुळे भाजपाचा या कार्यक्रमाशी काहीही संबंध नाही, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केल्यानंतर शरद पवार यांनी साहित्य संमेलनाच्या समारोपात सावरकरांचा उल्लेख केला. साहित्य संमेलनातून सावरकरांचे नाव वगळण्यात आल्यामुळे फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली होती. यावरुन भाजपच्या लोकांकडून विनाकारण वाद तयार करण्यात येत असल्याचा शरद पवार म्हणाले.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.