Vaishali Darekar: श्रीकांत शिंदेंची हॅट्रिक होणार ? काय म्हणाल्या वैशाली दरेकर

397
चांगला बॉलर असेल तर कधी कधी हॅट्रिक चुकते. असा टोला त्यांनी यावेळेस लगावला. (Vaishali Darekar)
चांगला बॉलर असेल तर कधी कधी हॅट्रिक चुकते. असा टोला त्यांनी यावेळेस लगावला. (Vaishali Darekar)

कल्याण लोकसभा मतदारसंघात यंदा चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. (Vaishali Darekar) शिवसेनेकडून खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde)यांना उमेदवारी जवळपास निश्चित आहे, मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. तर उबाठा गटाकडून कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी वैशाली दरेकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. वैशाली दरेकर (Vaishali Darekar) यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. श्रीकांत शिंदेंची (Shrikant Shinde) हॅट्रिक होणार नाही, समोर चांगला बॉलर असेल, तर कधी कधी हॅट्रिक चुकते, असा टोला त्यांनी या वेळेस लगावला. (Vaishali Darekar)

(हेही वाचा –AC Local : उन्हाच्या झळा लागताच लोकल प्रवाशांची एसी लोकलकडे धाव)

उद्धव ठाकरे देतील, ती जबाबदारी पार पाडणार

या वेळी बोलताना वैशाली दरेकर (Vaishali Darekar)म्हणाल्या, “माझ्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तीला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आनंद झाला आहे. लोकांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. उद्धव ठाकरे देतील ती जबाबदारी पार पाडणार, मी शिवसेनेची खासदार म्हणून लोकसभेत जाणार. समोर कोण आहे, हे महत्त्वाचं नाही. कधी कधी हॅट्रिक चुकते, समोरचा बॉलर जर जुना जाणता असेल तर हॅट्रिक चुकते. श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी आतापर्यंत ज्या शिड्या पार केल्या, त्यासाठी त्यांना उद्धव ठाकरेंनी मदत केली आहे. ज्या शिवसैनिकांनी श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांना दोन वेळा खासदार केलं, तेच शिवसैनिक आता त्यांना पाडणार”, असे त्या म्हणाल्या. (Vaishali Darekar)

(हेही वाचा – वंचितकडून Vasant More यांच्या उमेदवारीमागे शरद पवार?)

कोण आहेत वैशाली दरेकर

वैशाली दरेकर (Vaishali Darekar)यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेनेमधूनच झाली होती. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडल्यानंतर वैशाली दरेकर या राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासोबत मनसेमध्ये गेल्या. 2009 मध्ये त्यांनी मनसेमधून लोकसभा निवडणूक देखील लढवली होती. त्यानंतरच्या काळात त्यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी ठाकरे गटासोबतच रहाणे पसंत केले होते. (Vaishali Darekar)

हे पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.