Vijay Vadettiwar : मलबार हिलसाठी अडून बसलेले वडेट्टीवारांकडे आता मंत्रालयासमोर राहणार

वडेट्टीवार मलबार हिलमधील प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनीयुक्त बंगल्यासाठी होते आग्रही

67
Vijay Vadettiwar : मलबार हिलसाठी अडून बसलेले वडेट्टीवारांकडे आता मंत्रालयासमोर राहणार
Vijay Vadettiwar : मलबार हिलसाठी अडून बसलेले वडेट्टीवारांकडे आता मंत्रालयासमोर राहणार

मलबार हिलमधील शासकीय बंगल्यासाठी अडून बसलेल्या विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांचा हट्ट पुरवण्यास महायुती सरकारने नकार दिला आहे. त्यामुळे त्यांना मंत्रालयासमोरील छोट्या बंगल्यावर समाधान मानावे लागणार आहे.

सामान्य प्रशासन विभागाने शुक्रवारी शासन निर्णय जारी करून विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना मंत्रालयासमोरील क-६ (प्रचितगड) या शासकीय बंगल्याचे वाटप केले. मात्र, वडेट्टीवार मलबार हिलमधील प्रशस्त आणि अत्याधुनिक सोयीसुविधांनीयुक्त बंगल्यासाठी आग्रही होते. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे त्यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. परंतु, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ मंत्र्यांना मंत्रालयासमोरील छोटे बंगले दिलेले असताना, वडेट्टीवार यांना मलबार हिलमधील बंगला दिल्यास नाराजी ओढवू शकते, ही बाब ध्यानात घेऊन त्यांना मंत्रालयासमोरील क-६ हा बंगला वितरित करण्यात आला आहे.

(हेही वाचा : Heart Disease: कोरोनानंतर ह्रदयविकाराच्या रुग्णांमध्ये वाढ, डब्ल्यूएचओने दिला सल्ला)

मलबार हिल का महत्त्वाचे?
राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आणि विरोधी पक्षनेत्यांना विहित कार्यकाळासाठी शासकीय बंगला दिला जातो. मुख्यमंत्र्यांसाठी त्यांचे अधिकृत शासकीय निवासस्थान म्हणून वर्षा बंगला राखीव ठेवण्याची प्रथा आपल्याकडे आहे. मंत्रिमंडळातील वरिष्ठ मंत्र्यांना मलबार हिलमधील बंगले, तर अन्य मंत्र्यांना मंत्रालयासमोरची निवासस्थाने दिली जातात. मलबार हिलमधील बहुतांश बंगले हे समुद्र किनाऱ्याला लागून असून, आकाराने मोठे आहेत. शिवाय त्यांची रचनाही प्रशस्त अशी आहे. याऊलट मंत्रालयासमोरचे बंगले तुलनेने लहान असल्याने मलबार हिलमध्ये बंगला मिळवा, यासाठी सर्वच मंत्री प्रयत्नशील असतात.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.