Uttar Pradesh Police : राज्यातील पोलीस प्रशासनाच्या चकमकीचा लेखाजोखा समोर, डीजीपी म्हणाले…

Uttar Pradesh Police :  उत्तर प्रदेशातील पोलीस प्रशासना(Uttar Pradesh Police)ने केलेल्या कारवाईचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील सरकारचा लेखाजोखा समोर आला आहे.

40

Uttar Pradesh Police :  उत्तर प्रदेशातील पोलीस प्रशासना(Uttar Pradesh Police)ने केलेल्या कारवाईचा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वातील सरकारचा लेखाजोखा समोर आला आहे. उत्तर प्रदेश पोलीस प्रशासना(Uttar Pradesh Police)ने गुन्हेगारी व गुन्हेगारांविरुद्ध शून्य सहनशीलतेच्या धोरणाखाली गुंडाराजविरोधात मोठी कारवाई केली आहे. मागील आठ वर्षांत २३४ कुख्यात गुन्हेगारांचे एन्काऊंटर केल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले.(Uttar Pradesh Police)

(हेही वाचा वर्धापन दिनीच Shiv Sena UBT ला जोरदार धक्का; मुंबई, ठाणे, गोव्यातून अनेक पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश )

दरम्यान, योगी आदित्यनाथ सरकारच्या गुन्हेगारी व गुन्हेगारांविरुद्ध शून्य सहनशीलतेच्या धोरणाखाली, राज्यातील पोलिसांनी गेल्या आठ वर्षांत जलद कारवाई केली आहे. पोलिसांनी आठ वर्षांत २३४ कुख्यात गुन्हेगारांचे एन्काऊंटर केले असून सर्वाधिक चकमकी मेरठ झोनमध्ये झाल्याची माहिती समोर आली आहे. मेरठमध्ये पोलीसांनी ४,१८३ कारवाई केल्या असून या कारवाईत ७,८७१ गुन्हेगारांना अटक करण्यात आल्याची माहितीसमोर आली आहे.

(हेही वाचा Karnataka Congress Government चे मुस्लिम लांगुलचालन; मुसलमानांचे आरक्षण आणखी वाढवणार )

तसेच, पोलिसांच्या कारवाईत २,८३९ गुन्हेगार जखमी झाल्याचेही माहिती उत्तर प्रदेश पोलिसां(Uttar Pradesh Police)नी दिली. गुन्हेगारीविरोधातील झीरो टोलोरन्स धोरणाबाबत बोलताना डीजीपी म्हणाले, धोरणांतर्गत जलद कारवाई करताना पोलीस प्रशासनाने एकूण १४,७४१ चकमकी केल्या असून आतापर्यंत ३०,२९३ गुन्हेगारांना अटक करण्यात आली आहे. यादरम्यान, उत्तर पोलीस प्रशासना(Uttar Pradesh Police)तील १८ पोलीस हुतात्मा झाल्याचेही त्यांनी सांगितले.

उत्तर प्रदेश पोलीस(Uttar Pradesh Police) प्रशासनाचे डीजीपी राजीव कृष्णा काय म्हणाले?

डीजीपी राजीव कृष्णा म्हणाले की, राज्यात सर्वाधिक चकमकी मेरठ झोनमध्ये झाल्या. जिथे पोलिसां(Uttar Pradesh Police)नी ४,१८३ कारवाया केल्या. या कारवाईत ७,८७१ गुन्हेगारांना अटक करण्यात आली तर २,८३९ गुन्हेगार जखमी झाले. पोलीस चकमकीत ७७ कुख्यात गुन्हेगार जागीच ठार झाल्याचेही त्यांनी सांगितले. मेरठ झोनमधील चकमकींमध्ये २,८३९ गुन्हेगार जखमी झाले. यावेळी ४५२ पोलीस जखमी झाले तर दोन पोलीस कर्तव्य बजावताना हुतात्मा झाले. चकमकीच्या कारवाईत मेरठ झोन राज्यात पहिल्या क्रमांकावर असल्याची माहिती राजीव कृष्णा यांनी दिली.(Uttar Pradesh Police)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.