२००९च्या निवडणुकीसाठी कोणी भरकटवला मालेगाव बाँबस्फोटाचा तपास?

142

पुरोगामी लोकशाही आघाडी सरकार (युपीए)मधील तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम आणि त्या वेळीचे तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांनी २००९ ची लोकसभा निवडणूक जिंकण्यासाठी तथाकथित हिंदू दहशतवादाचे कुभांड रचले होते, हे सिद्ध करणारे खुलासे आता मालेगाव बॉम्बस्फोट २००८चा खटला सुरू झाल्यावर होत आहेत. यामध्ये जे साक्षीदार जमा केले होते, त्यांच्या उलट तपासणीत समोर येवू लागले आहे.

मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपास ज्या दिशेने सुरू होता, त्याची दिशा तत्कालीन गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी वळवला आणि त्यामध्ये एक एक करून हिंदुत्वावादी कार्यकर्त्यांना अटक करण्याचा सपाटा लावला होता. त्यामध्ये लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहित, साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यासह सात जणांना अटक करण्यात आली. अभिनव भारत या संघटनेचे हे कार्यकर्ते असून त्यांचा हिंदुराष्ट्र स्थापन करण्याचा हेतू होता. हे हिंदू दहशतवादी आहेत, असे सिद्ध करण्यात आले. त्याकरता तत्कालीन एटीएस प्रमुख स्व. हेमंत करकरे यांच्या नेतृत्वाखाली हे अटक सत्र सुरू होते. त्यांच्या जोडीला मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे 2008 च्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करताना एटीएसचे अतिरिक्त आयुक्त होते. परमबीर सिंग यांच्यावर सध्या खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांना मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आले आहे.

(हेही वाचा शाळेत हिजाब परिधान करायचा का? उच्च न्यायालय काय सांगतंय? वाचा…)

खटला सुरू करण्यास जाणीवपूर्वक दिरंगाई

या प्रकरणी एकूण २२० साक्षीदार आहेत. जाणीवपूर्वक हा खटला सुरू करण्यात दिरंगाई करण्यात येत होती. कारण खटला सुरू झाल्यावर साक्षीदारांची साक्ष तपासली जाणार होती, एकदा का साक्षीदारांची उलट तपासणी सुरू झाली तर साक्षीदारांनी दिलेल्या साक्ष मागील वस्तुस्थिती समोर येणार होती, हे होवू नये म्हणून या खटल्यातील आरोपीचे वकील हा खटला सुरू करण्याची मागणी करत होते तरी खटला सुरू केला जात नव्हता. या सगळ्याचा परिणाम म्हणून २००८ पासून पुढे ९ वर्षे या प्रकरणातील आरोपी कारागृहात खितपत पडले अखेर त्यांना २०१७ साली जामीन मंजूर झाला. आणि डिसेंबर २०२० पासून खटला सुरू झाला. हा खटला इन कॅमेरा घेण्यात यावा, अशी लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहित यांची मागणी मान्य करण्यात आली. त्यामुळे हा खटला सध्या इन कॅमेरा सुरू झाला आहे. या खटल्यातील १७ साक्षीदारांनी एकामागो एक करत साक्ष फिरवली आहे. यातील साक्षीदारांनी त्यांना त्या वेळीच्या एटीएस अधिकाऱ्यांनी जबरदस्तीने आपली साक्ष नोंदवून घेतली, असे सांगितले.

तेव्हाच्या सत्ताधाऱ्यांनी स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी जबरदस्तीने आरोपींना अडकवण्याचा प्रयत्न केला, सत्य परेशान हो सकता है पराजित नही!
– सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते

साक्षीदारांनी कशा फिरवल्या साक्ष?

  • एका साक्षीदाराचा २००९ मध्ये जबाब नोंदविण्यात आला होता. त्यानुसार साक्षीदार हा स्वामी शंकराचार्य (आरोपी सुधाकर द्विवेदी) यांना नाशिकमध्ये भेटण्यासाठी गेला होता. तिथे बैठकीत पुरोहित यांनी हिंदुत्वावर व्याख्यान दिले होते, असे त्याने जबाबात म्हटले होते. खटल्यादरम्यान यावर साक्षीदाराने असहमती दर्शविली आणि मी नाशिकमध्ये गेलोच नाही, असे सांगितले.
  • एका साक्षीदाराने आपली साक्ष फिरवत दावा केला होता की, त्याला धमकी देऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच इतर आसएसएस नेत्यांची नावे घेण्यास एटीएसने भाग पाडले होते. त्यासाठी त्याला तीन – चार दिवस ओलीस ठेवले होते. या दाव्यानंतर, आरएसएस नेते इंद्रेश कुमार यांनी काॅंग्रेस नेत्यांना माफी मागण्यास सांगितले होते.

आम्ही त्यावेळीच्या केंद्र सरकारच्या विरोधात टीका करत होतो, बोलत होतो, म्हणून आम्हाला या प्रकरणात एक एक करत अडकवण्यात आले. आजवर अनेक परकीय आक्रमणकर्ते होऊन गेले पण कुणीही हिंदूंना दहशतवादी म्हटले नाही, पण सोनिया गांधी, अहमद पटेल, शकील अहमद, शरद पवार, सुशील कुमार शिंदे, शिवराज सिंग चौहान यांनी भगवा दहशतवाद, हिंदू दहशतवाद असे लेबल लावले. आता ते सगळे जण हे देश विरोधी होते, हिंदू विरोधी होते, हे समोर येऊ लागले आहे.
– समीर कुलकर्णी, आरोपी

काय आहे मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण?

29 सप्टेंबर 2008 रोजी मुंबईपासून सुमारे 200 किमी अंतरावर असलेल्या नाशिकच्या मालेगाव शहरातील एका मशिदीजवळ मोटार सायकलवर बांधलेल्या स्फोटकांचा स्फोट होऊन 6 जणांचा मृत्यू झाला होता आणि 100 हून अधिक जण जखमी झाले होते. या प्रकरणातील आरोपींमध्ये लोकसभा सदस्य प्रज्ञा सिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित, शुदाकर दिवेडी, मेजर (निवृत्त) रमेश उपाध्याय, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी आणि समीर कुलकर्णी यांचा समावेश आहे, हे सर्व सध्या जामिनावर बाहेर आहेत.

(हेही वाचा हिजाब प्रकरणाचे दुसऱ्या दिवशीही महाराष्ट्रात उमटले पडसाद)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.