Nitin Gadkari : उद्धव ठाकरेंची नितीन गडकरींना ऑफर; नागपूरकरांची गडकरींना बिनविरोध निवडून देण्याची मागणी

166

भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना अद्याप उमेदवारी जाहीर झालेली नाही. त्यावर उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांनी तुम्ही महाविकास आघाडीत या, तुम्हाला निवडणूक आणण्याची जबाबदारी आमची असे म्हटले. त्यावर आता नागपूरच्या नागरिकांनी नितीन गडकरी यांच्या कामांचे विरोधी पक्षाकडून अनेक वेळा कौतूक झाले आहे. आता हाच मुद्दा हेरुन नागपूरच्या नागरिकांनी नितीन गडकरी यांची लोकसभा निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी पुढे केली आहे.

(हेही वाचा Veer Savarkar : शिवाजी पार्क सभेत बोला; पण वीर सावरकरांचा अवमान कराल, तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही; मनसेचा राहुल गांधींना इशारा)

नागपुरातील सामाजिक संस्था एकत्र

नागपुरातील काही सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची निवडणूक बिनविरोध करण्याची मागणी केली आहे. नागपुरातच नाही तर देशातही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे लोकाभिमुख काम करत आहेत. यामुळे त्यांना बिनविरोध लोकसभेत खासदार म्हणून पाठवा, अशी मागणी करणारे फलक नागपुरात सामाजिक संघटनांचे दिसत आहेत. नागपुरातील लोकमान्य टिळक पुतळ्याजवळ उभे राहत ही मागणी करण्यात आली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.