Veer Savarkar : उद्धव ठाकरेंनी भगूरमध्ये वीर सावरकरांना केले अभिवादन

192

अयोध्येत श्रीराम मंदिरात श्रीरामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली. अयोध्येत हा सोहळा संपन्न होत असताना महाराष्ट्रात मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Veer Savarkar) हे नाशिक दौऱ्यावर होते, यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्वप्रथम भगूर येथील वीर सावरकरांचे निवासस्थान भगूरला भेट दिली. तेव्हा त्यांनी तेथील वीर सावरकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. त्यावेळी खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत, खासदार अरविंद सावंत हे उपस्थित होते.

१२ जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिकच्या दौऱ्यावर होते, त्यावेळी ते सावरकर स्मारकात आले नव्हते, त्यांना विसर पडल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नाशिकच्या दौऱ्यावर असताना प्रथम भगूरला भेट देणे याला महत्व प्राप्त झाले आहे. आगमी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने नाशिकमध्ये राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित केले आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Veer Savarkar) दोन दिवसीय नाशिक दौऱ्यावर आहेत.

(हेही वाचा Muslim : पनवेल रेल्वेस्थानक परिसरात भगवे ध्वज लावण्यास धर्मांधांचा विरोध )

कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत

उद्धव ठाकरेंसह आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते. नाशिक विमानतळावर त्यांचे ठाकरे गटाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर उद्धव ठाकरे हे भगूर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मारकाला भेट देण्यासाठी गेले. मात्र त्याआधी त्यांनी ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांच्या घरी भेट दिली. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्मारकाला भेट दिली. प्रांगणातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. यावेळी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. दरम्यान, उध्दव ठाकरे यांचे ओझर विमानतळ ते भगूर दरम्यान अनेक ठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले.

उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण भगूर वाड्याची केली पाहणी 

यावेळी उद्धव ठाकरे यांचे स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अस्थायी विश्वस्त शैलेंद्र चिखलकर, सदस्य सुधीर सूर्यवंशी यांनी स्वागत केले. त्यावेळी स्मारकाच्या वतीने युवा सेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांना वीर सावरकर यांची प्रतिमा आणि पुस्तक भेट म्हणून दिले.

bhagur

याप्रसंगी उद्धव ठाकरे यांनी भगूरचा वाडा पाहिला आणि स्मारकाने या वाड्याचे अत्यंत चांगल्या पद्धतीने जतन केले, त्याबद्दल स्मारकाचे कौतुक केले.

 

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.