‘मी एक शब्द बोललो, तर तळपायाची आग मस्तकाला का गेली?’; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सवाल

169
‘मी एक शब्द बोललो, तर तळपायाची आग मस्तकाला का गेली?'; उद्धव ठाकरेंचा फडणवीसांना सवाल

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या विदर्भ दौऱ्यात देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करतांना ‘कलंक’ या शब्दाचा प्रयोग केला. त्यावरून सध्या राज्यातील राजकारण तापलं आहे. अशातच “मी कलंक म्हटलं, त्यात एवढं लागण्यासारख काय? मी एक शब्द बोललो, तर तळपायाची आग मस्तकाला का गेली? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

“तुम्ही एखाद्या माणसला भ्रष्ट म्हणता, त्यावेळी कलंक लावत नाही का? तुम्ही भ्ष्टाचाराचे आरोप करुन एखाद्याला कलंकित करता. नंतर त्याला मंत्रिमंडळात स्थान देता, मग त्याने समाजात वावरायच कसं? माझा कलंक शब्द इतका परिणामकारक ठरेल असं मला वाटलं नव्हतं” असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी भाजप पक्षावर निशाणा साधला आहे.

(हेही वाचा – West Bengal violence : मतमोजणी केंद्राबाहेर स्फोट; आत्तापर्यंतच्या हिंसाचारात ३६ जणांचा मृत्यू)

नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे?

“माझा कलंक शब्द इतका प्रभावी आहे असं मला वाटलं नव्हतं. जनाचं नाही किमान मनाचं भान ठेवा आरोप करताना. मला हे काही बोलताना गंमत वाटत नाही. मी अफझल खानाची स्वारी असंही म्हटलं होतं. पण त्यामागे माझा हेतू हा होता की ईडी आणि आयकर हे जे काही घराघरात घुसवत आहेत त्याचा अर्थ काय आहे? ते कुटुंब कलंकित होत नाही का? मी एक शब्द वापरला तर इतकी तळपायाची आग मस्तकाला का गेली? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे.

फोडाफोडीचं राजकारण लोकांना पटलेलं नाही

सध्या जे काही फोडाफोडीचं राजकारण सुरु झालं आहे त्या विरोधात लोकांच्या मनात चिड आहे. मला त्यांनी सांगितलं की आम्हाला हे मुळीच पटलेलं नाही. लोक मतदानाची वाट बघत आहेत असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

सरकार दारोदारी जातं पण घरात काय ते त्यांना माहित नाही

मी पाहिलं की सरकार दारोदारी जातं आहे पण लोकांची कामं होत नाही. सरकार आपल्या दारी जाऊन काही उपयोग नाही. त्यापेक्षा लोकांच्या घरात काय आहे ते पाहिलं पाहिजे. शासन आपल्या दारी फक्त कार्यक्रम केला जातोय, पण त्याचा फायदा मिळतोय का? त्या योजनांचा पाठपुरावा करण्याचा कार्यक्रमच मी लोकांना दिला आहे. होऊन जाऊ दे चर्चा असं त्याचं नाव आहे. विदर्भात म्हणावा तास पाऊस अजून झालेला नाही. विदर्भात तर पाऊस पडला नाही तर सरकारी योजनांच्या होड्या कुठे सोडायच्या हे विचारायची वेळ आली आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मत कुणालाही द्या सरकार माझंच होणार हा जो पायंडा सध्या पडला आहे तो घातक आहे. लोकांचा विश्वास उडाला तर जनता रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मग ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराच काय झालं?

“मोदींना आता पवारांच्या हस्ते टिळक पुरस्कार मिळणार. मग ७० हजार कोटींच्या भ्रष्टाचाराचं काय झालं? मी एक शब्द बोललो, तर एवढं लागलं, पण तुम्ही वाटेल ते आरोप करता, माझ्या ऑपरेशनरुन चेष्टा करता, मी जे भोगले ते त्यांना भोगाव लागू नये एवढीच इच्छा” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.