बुडते ती निष्ठा, तरंगते ती विष्ठा; तरी सुद्धा यात्रेचं नाव निष्ठा?

80

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असताना अनेक लाईव्ह सेशन्स घेतले. ते भारताचे पहिले मुख्यमंत्री आहेत ज्यांनी राज्याचा कारभार घरातूनच सांभाळला. या लाईव्हमध्ये त्यांनी अगदी विचित्र विधाने केली होती. अशी अनेक विधाने होती, ज्यांना काहीच अर्थ लागणार नाही. त्यांचा किंबहुना हा शब्द देखील खूप गाजला होता.

शिवसेनेला शाबूत ठेवण्यासाठी निष्ठा यात्रा

शिवसेनेच्या आमदारांनी उठाव केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी एक लाईव्ह घेतलं होतं, तेव्हा त्यांनी “बुडते ती निष्ठा, तरंगते ती विष्ठा” अशा प्रकारचं भन्नाट पण नेहमीप्रमाणे असंबद्ध विधान केलं होतं. शिवसेनेतील अनेक नेते असंबद्ध विधाने करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. किशोरी पेडणेकर यांची असंबद्ध विधाने देखील खूप गाजली आहेत. तर असाप्रकारचं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. आणि आता आदित्य ठाकरे हे शिल्लक असलेल्या शिवसेनेला शाबूत ठेवण्यासाठी निष्ठा यात्रा काढत आहेत.

( हेही वाचा : राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत केवळ पंधरा मिनिटे चर्चा, खासदारांचा कल जाणून घेण्यावर ठाकरेंचा भर)

म्हणजे जे ठाकरेंशी (शिवसेनेशी नव्हे) एकनिष्ठ आहेत, ते ठाकरेंपासून दूर जाऊ नये म्हणून ही निष्ठा यात्रा काढण्यात येत आहे. पण जर बुडते ती निष्ठा असेल म्हणजे उद्धव ठाकरेंच्या बोलण्यानुसार निष्ठा ही बुडणारंच असेल तर निष्ठा यात्रेने काय साध्य होणार आहे? निष्ठा यात्रा काढून शिवसैनिक ठाकरेंशी एकनिष्ठ राहणार आहेत का? कारण ज्या ज्या वेळी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत बोलायचे, त्या त्या वेळी एकेक आमदार एकनाथ शिंदेंच्या गटात सामील व्हायचा हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे.

याचा अर्थ आता शिवसेनेच्या नेत्यांना ठाकरेंचं नेतृत्व नकोय असा संदेश सर्व आमदारांनी दिलेला आहे. म्हणजे उद्धव ठाकरेंच्या विधानानुसार निष्ठा केव्हाचीच बुडालेली आहे. मग आता जे सुरु आहे, ते तरंगतंय त्यासाठी सुरु आहे की बुडलंय त्यासाठी सुरु आहे. हे विधान जरा असंबद्ध वाटत असलं तरी महाराष्ट्राच्या जनतेला अशा असंबद्ध विधानांची आता सवय झालेली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.