T20 World Cup, Ind vs Canada : ‘चहलच्या आधी कुलदीपचा संघात समावेश व्हावा,’ – पियुष चावला

T20 World Cup, Ind vs Canada : भारतीय संघात ४ फिरकीपटूंचा समावेश आहे 

96
T20 World Cup, Ind vs Canada : ‘चहलच्या आधी कुलदीपचा संघात समावेश व्हावा,’ - पियुष चावला
T20 World Cup, Ind vs Canada : ‘चहलच्या आधी कुलदीपचा संघात समावेश व्हावा,’ - पियुष चावला
  • ऋजुता लुकतुके

भारतीय संघाचा माजी लेगस्पिनर पियुष चावलाच्या (Piyush Chawla) मते, भारतीय संघात तिसरा फिरकीपटू म्हणून यजुवेंद्र चहल नाही, तर कुलदीप यादव (Kuldeep Yadav) असावा. पुढील आठवड्यात सुपर ८ सामने सुरू होत आहेत. भारताची आता नजर या महत्त्वाच्या टप्प्यावर असणार आहे. कारण, आता स्पर्धेतील तुल्यबळ संघ आमने सामने येतील. वेस्ट इंडिजमधील वातावरणात फिरकीपटूंना संघात स्थान मिळू शकेल. (T20 World Cup, Ind vs Canada)

(हेही वाचा- T20 World Cup 2024 : फ्लोरिडातील वादळाचा फटका पाकिस्तानलाही? स्पर्धेतून बाद होण्याची भीती)

स्पर्धेच्या पुढील टप्प्यात फिरकीपटू अधिक महत्त्वाची भूमिका बजावू शकतील, असं पियुष चावला (Piyush Chawla) वाटतं. ‘न्यूयॉर्कमधील खेळपट्टी थोडी धोकादायकच होती. अशा खेळपट्टीवर तीन पैकी तीन सामने जिंकून भारतीय संघाने आपलं वर्चस्व दाखवून दिलं आहे. आता हा संघ मोठा डाव खेळण्यासाठी सिद्ध होत आहे,’ असं सुरुवातीला चावला म्हणाला. मुंबईत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स मॅनेजमेंट संस्थेच्या वार्षिक पदवीदान समारंभात तो बोलत होता. (T20 World Cup, Ind vs Canada)

वेस्ट इंडिजमधल्या बदललेल्या वातावरणात आणखी एक फिरकीपटू संघात खेळू शकतो, असं चावलाला वाटतं. ‘सुपर ८ मध्ये फिरकीपटूंचं महत्त्व वाढेल. ते पाहता, कुलदीप किंवा यजुवेंद्रला संधी मिळू शकते. पण, मागच्या दीड वर्षातील कामगिरीच्या जोरावर माझी पसंती कुलदीपला असेल. यजुवेंद्रने आयपीएलमध्ये सर्वोत्तम कामगिरी केली असली, तरी कुलदीपचं सातत्यपूर्ण योगदान विसरता येणार नाही. जडेजा तसंच अक्षर अष्टपैलू फिरकीपटूंची जागा निभावत आहेत. त्यामुळे त्यांना बदलता येईल असं वाटत नाही. अशावेळी कुलदीपचं पारडं जड आहे,’ असं मत चावलाने मांडलं. (T20 World Cup, Ind vs Canada)

(हेही वाचा- ‘एका अधिकाऱ्यामुळे तुमचं सरकार अडचणीत येईल’, Mohit Kamboj यांचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा!)

पहिल्या टप्प्यात भारतीय गोलंदाजांनी केलेल्या कामगिरीचं मात्र चावलाने कौतुक केलं. खासकरून पाकिस्तान विरुद्ध ११९ धावा केल्या असताना मिळवलेल्या विजयामुळे गोलंदाजांची सरस कामगिरी अधोरेखित होते, असं त्याला वाटतं. (T20 World Cup, Ind vs Canada)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.