Uddhav Thackeray : ‘दिल्लीवारी’ वर ठाकरे आता काय बोलणार..

सध्या उबाठाला सगळ्या निर्णयांसाठी दिल्लीतील काँग्रेस हायकमांडवर अवलंबून रहावे लागत असल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. उबाठा नेते जागावाटपासाठी एकदा दिल्लीला जाऊन आले असून पुन्हा एक दिल्लीवारी करणार असल्याची चर्चा आहे.

190
Uddhav Thackeray यांच्या धारावीतील सभेला मुस्लिम जमले की जमवले
Uddhav Thackeray यांच्या धारावीतील सभेला मुस्लिम जमले की जमवले

भाजप (BJP) आणि शिवसेना (Shiv Sena) (शिंदे गट) यांच्यावर वेळोवेळी दिल्लीवारी करीत असल्याचा ठपका ठेवत सगळे निर्णय दिल्लीतून होत असल्याचा आरोप उबाठा नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) नेहमी करत असतात. सध्या उबाठाला सगळ्या निर्णयांसाठी दिल्लीतील काँग्रेस (Congress) हायकमांडवर अवलंबून रहावे लागत असल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. उबाठा नेते जागावाटपासाठी एकदा दिल्लीला जाऊन आले असून पुन्हा एक दिल्लीवारी करणार असल्याची चर्चा आहे. (Uddhav Thackeray)

२३ जागांवर दावा, पण निर्णय दिल्लीत

महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) तीनपैकी दोन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) (उबाठा) आणि शरद पवार (Sharad Pawar) (NCP), महाराष्ट्रात रहात असूनही अंतिम निर्णय काँग्रेस पक्षप्रमुख दिल्लीत घेत असल्याचे दिसून येते. उबाठाने राज्यात लोकसभेच्या ४८ पैकी २३ जागांवर दावा करुन आठवडा झाला तरी अद्याप काँग्रेसकडून याबाबत काही अंतिम निर्णय घेतला गेला नाही. उबाठाचा मित्रपक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) इंडी आघाडीत (I.N.D.I. Alliance) सामावून घेण्याबाबतदेखील काँग्रेसने वेळकाढू धोरण स्वीकारले आहे. (Uddhav Thackeray)

(हेही वाचा – MG 5 EV : मॉरिस गराज कंपनीची नवीन ईव्ही कार भारतात होतेय लाँच, किंमत पाहून व्हाल थक्क)

उद्धव ‘वाकरे’ आडनाव सार्थ करतील

शिवसेना (Shiv Sena) (शिंदे गट) प्रवक्त्या ज्योती वाघमारे (Jyoti Waghmare) यांनी याबाबत थेट उद्धव ठाकरेंना टार्गेट केले. “उद्धवजी ठाकरेंनी अनैसर्गिक युती करून मतदारांशी विश्वासघात केला. उबाठा गट २२, २८ जागा मागत असला तरीही काँग्रेस आणि पवार साहेबांनी आठ किंवा दहा जागांचा तुकडा फेकला तरी ते महाविकास आघाडीत लाचारीने सहभागी होतील आणि आपले ‘वाकरे’ हे आडनाव सार्थ करतील,” अशी बोचरी टीका केली आहे. (Uddhav Thackeray)

शिंदे-फडणवीस यांची प्रकल्पासाठी दिल्लीवारी

गेल्या वर्षी शिवसेना नेते एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी उठाव करीत भाजपसोबत राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री म्हणून शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी काही प्रकल्पांबाबत दिल्लीला जाऊन केंद्रीय मंत्र्यांकडे पाठपुरावा केला, त्यावर उद्धव ठाकरे यांनी टीका करीत महाराष्ट्रातले निर्णय दिल्लीत का होतात, असे काही प्रश्न उपस्थित केले होते. (Uddhav Thackeray)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.