प्रतिनिधी
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या(UBT)वर्धापन दिन सोहळ्यात सध्या राजकीय वर्तुळात एका वेगळ्याच चर्चेने जोर धरला आहे. दररोजच्या पत्रकार परिषदांमधून आपल्या आक्रमक शैलीत विरोधकांवर तुटून पडणारे संजय राऊत या कार्यक्रमात शांत कसे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. याच मुद्द्यावरून आता भाजपच्या गोटातून खोचक टिप्पणी करण्यात आली आहे.(UBT)
भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनेवर भाष्य केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये असा दावा केला आहे की, वर्धापन दिनाच्या मंचावर संजय राऊत यांनी नेहमीच्या शैलीत भाषण करण्याची पूर्ण तयारी केली होती. मात्र, आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या सूचनेनुसार त्यांना भाषणाची संधीच मिळाली नाही. यावरूनच, “पक्षाच्या मंचावर ज्यांचा आवाज नेहमी घुमत असतो, त्यांचाच आवाज यावेळी ‘म्युट’ का करण्यात आला?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.(UBT)
(हेही वाचा – FIFA World Cup 2026 : मोरोक्कोने स्कॉटलंडला १-० ने हरवले )
नेहमी संपूर्ण पक्षाची सूत्रे आपल्या हातात असल्याचा आव आणणाऱ्या संजय राऊतांचा ‘रिमोट’ आता आदित्य ठाकरेंच्या हातात गेल्याची चर्चा या निमित्ताने राजकीय वर्तुळात रंगली आहे. उबाठा गटाच्या अंतर्गत या कार्यक्रमात घडलेला हा प्रकार म्हणजे केवळ योगायोग आहे की पक्षांतर्गत बदलणाऱ्या समीकरणांची ही नांदी, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.(UBT)
विरोधकांनी या घटनेला ‘आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत’ अशा संघर्षाच्या नजरेतून पाहण्यास सुरुवात केली असून, यावर उबाठा गटाकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.(UBT)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community

