‘विदर्भ पॅलेस’चा कायापालट! २०२८ पर्यंत नागपुरात उभे राहणार हायटेक विधानभवन; CM Devendra Fadnavis यांचा ‘मेगा प्लॅन’

'विदर्भ पॅलेस'चा कायापालट! २०२८ पर्यंत नागपुरात उभे राहणार हायटेक विधानभवन; CM Devendra Fadnavis यांचा 'मेगा प्लॅन'

88
ऊस उत्पादक शेतकऱ्यांपासून नाशिकच्या साहित्यिकांपर्यंत; फडणवीस सरकारच्या Cabinet meeting मधले सात मोठे निर्णय
ऊस उत्पादक शेतकऱ्यांपासून नाशिकच्या साहित्यिकांपर्यंत; फडणवीस सरकारच्या Cabinet meeting मधले सात मोठे निर्णय
प्रतिनिधी

​नागपूरच्या ऐतिहासिक वारशात आता एका आधुनिक शिरपेचाची भर पडणार आहे. १९२० च्या जुन्या इमारतीचा निरोप घेत, तब्बल ६२ हजार चौरस फुटांच्या विस्तीर्ण जागेत नवीन, भव्य आणि अद्ययावत विधानभवन उभारण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(CM Devendra Fadnavis)यांनी व्यक्त केला आहे. २०२८ पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे कडक निर्देश त्यांनी दिले असून, या प्रकल्पासाठी कोट्यवधींच्या निधीची तरतूदही करण्यात आली आहे.

(हेही वाचा – T20 World Cup Prize Money : पाकला टी-२० विश्वचषकासाठी मिळाले ४.८० कोटी रुपये, भारताला किती पैसे मिळाले? )

​असे असेल नवे सत्ताकेंद्र:

नवीन विधानभवन केवळ एक इमारत नसून ते आधुनिक लोकशाहीचे प्रतीक असेल. ६६२ कोटींच्या मुख्य संकुलात ४०० आसनक्षमतेची विधानसभा, १२० जागांची विधान परिषद आणि ७०० प्रतिनिधी बसू शकतील असे भव्य मध्यवर्ती सभागृह साकारले जाणार आहे. सोबतच ३३९ कोटी रुपये खर्चून एक स्वतंत्र प्रशासकीय इमारतही उभारली जाईल. ४ मजली या इमारतीत हायटेक समिती कक्ष आणि पत्रकार कक्ष यांसारख्या सर्व सोयीसुविधांचा समावेश असेल.(CM Devendra Fadnavis)

​दळणवळणाची नवी क्रांती: नेरळ-शिरूर महामार्ग

केवळ नागपूरच नव्हे, तर मुंबई-पुणे प्रवासाचे चित्रही बदलणार आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील ताण कमी करण्यासाठी ‘नेरळ ते शिरूर’ या नवीन महामार्गाला पायाभूत सुविधा समितीने तत्त्वतः मंजुरी दिली आहे. रायगडच्या कर्जत-नेरळपासून सुरू होणारा हा मार्ग थेट पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील शिरूरला जोडला जाईल, ज्यामुळे प्रवाशांचा वेळ आणि इंधन दोन्ही वाचणार आहे.(CM Devendra Fadnavis)

​या महत्त्वपूर्ण बैठकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह वरिष्ठ सनदी अधिकारी उपस्थित होते. या प्रकल्पांशिवाय पुणे-शिरूर सहा पदरी उन्नत मार्ग आणि अटल सेतूशी जोडणाऱ्या इतर महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामांनाही आता वेग येणार आहे. राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा हा ‘बदलाचा महामार्ग’ ठरेल, असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला.(CM Devendra Fadnavis)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.