राज्य मंत्रिमंडळातील भाजपाच्या तीन मंत्र्यांना नारळ मिळणार?

124
राज्य मंत्रिमंडळातील भाजपाच्या तीन मंत्र्यांना नारळ मिळणार?
राज्य मंत्रिमंडळातील भाजपाच्या तीन मंत्र्यांना नारळ मिळणार?

शिंदे-फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार येत्या काही दिवसांत होईल, अशा चर्चा सुरू असतानाच, विद्यमान मंत्र्यांपैकी भाजपाच्या कोट्यातील तीन जणांना नारळ मिळून शकतो, अशी कुजबूज कानावर येऊ लागली आहे. कामगिरी समाधानकारक नसल्याने त्यांच्या जागी इतरांना संधी दिली जाईल, असे कळते.

(हेही वाचा – IAS officers transfer : दहा अधिकाऱ्यांच्या बदल्या; राजगोपाल देवरांकडे महसूल, तर असीम कुमार गुप्ता यांच्याकडे नगरविकास विभागाची जबाबदारी)

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळात कार्यरत असणाऱ्या भाजपाच्या मंत्र्यांचे रिपोर्टकार्ड तयार करण्याची जबाबदारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर देण्यात आली होती. मंत्रीपदी विराजमान झाल्यापासून कोणकोणत्या नव्या योजना सुरू केल्या, त्यांची अंमलबजावणी कशाप्रकारे सुरू आहे, पक्ष संघटनेशी समन्वय साधून त्या तळागाळात पोहोचवण्यासाठी कोणते प्रयत्न केले, पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी किती हातभार लावला, याचा लेखाजोखा बावनकुळेंनी घेतला. हे रिपोर्टकार्ड तयार करण्यासाठी प्रत्येक मंत्र्याच्या खात्याला स्वतंत्र ‘व्यक्ती’ देण्यात आला होता. त्याचा एकत्रित अहवाल बावनकुळेंनी केंद्राला सादर केला. त्यानंतर कामगिरी समाधानकारक नसलेल्या तीन मंत्र्यांना नारळ देण्याची सूचना केंद्रीय नेत्यांकडून करण्यात आली आहे.

या तीन मंत्र्यांची नावे अद्याप कळू शकलेली नाहीत. मात्र, मंत्रीपदी विराजमान झाल्यापासून संघटनात्मक कामकाजात टाळाटाळ, बेताल-वादग्रस्थ वक्तव्ये, कार्यकर्त्यांचे प्रश्न आणि तक्रारींकडे डोळेझाक, विधिमंडळ अधिवेशनात विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास असमर्थ ठरणाऱ्यांना यावेळी डच्चू दिला जाणार आहे, अशी माहिती भाजपाच्या अंतर्गत सूत्रांनी दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.