Uddhav Thackeray : ही तर मॅच फिक्सिंग; हा निकाल म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा अवमान; उद्धव ठाकरेंची टीका

181
Uddhav Thackeray नेतृत्वाखालील शिवसेनेत लोकशाहीच्या मार्गाने निवडणूका झाल्या?
Uddhav Thackeray नेतृत्वाखालील शिवसेनेत लोकशाहीच्या मार्गाने निवडणूका झाल्या?

सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश हे परिमाण मानले जातात. पण नार्वेकरांनी जो निकाल दिला आहे. यातून त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचाच अवमान केला आहे. अर्थात निकालाची मॅच फिक्सिंग होती, असा घणाघात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विधानसभा अध्यक्षांवर केला. तर आमची लढाई सुरूच राहील, आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत, पण जनता देखील यातून सर्वांना धडा शिकवेल, असा विश्वास ठाकरेंनी व्यक्त केला.

तर मग आमचे आमदार अपात्र का केले नाही? 

जर आमची घटना ग्राह्य धरत नसाल तर आम्हाला अपात्र का केले नाही. निर्णय देताना पायाच चुकला आहे. तो डळमळीत आहे. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केला आहे. त्यामुळे त्याचा गैरफायदा घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाचे अस्तित्व टीकणार आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. माझी सर्वोच्च न्यायालयास विनंती आहे. निवडणुकीच्या आधी दूध की दूध आणि पाणी का पाणी होऊन जाऊ द्या, अशी विनंती उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाकडे केली. अवमान याचिका टाकता येते का, याचा विचार करू, असेही ते म्हणाले. शिंदेंची शिवसेना होऊच शकत नाही, हे सर्व काही सेटिंग होती. 31 डिसेंबरची तारीख, 10 तारीख अशी चालढकल करायची होती. तर पक्षांतर बंदीच्या कायद्याला त्यांना संपवायचे आहे. त्यामुळे आगामी काळातील मार्ग सोपा करण्याचे काम नार्वेकर करत आहेत, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

(हेही वाचा Shiv Sena MLA Disqualification Case: शिंदेंची हकालपट्टी करण्याचा अधिकार ठाकरेंना एकट्याला नाही, नार्वेकरांचा ठाकरे गटाला धक्का)

आजचा निर्णय हा सर्वोच्च नाही

गद्दार कुणाच्या जीवावर निवडून आले. नेता समाजाला दिशा दाखवण्याचे काम करत असतो. परंतु नेता जर चुकीच्या मार्गाने जात असेल तर काय दिशा दाखवणार? जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करून शिवसेना संपवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असेही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.