भारत शुक्रवारी आपला ७९ व्या स्वातंत्र्यदिन साजरा (Independence Day) करत आहे. यानिमित्ताने नेपाळ,मालदीव, सिंगापूर आणि अमेरिका या देशांनी शुक्रवारी १५ ऑगस्टला भारताला शुभेच्छा व सदिच्छा दिल्या आहेत. (Independence Day)
(हेही वाचा – Balochistan : ‘अमेरिकन उत्खनना’चा मार्ग तयार होतोय; कॅनेडियन कंपनीने ‘या’करिता G7 राष्ट्रसमूहाला घातली साद)
President extends Independence Day greetings to the President and the Prime Minister of Indiahttps://t.co/2EEOywO1qJ pic.twitter.com/gb2jZcgycE
— The President’s Office (@presidencymv) August 15, 2025
मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू (Maldives President Mohamed Muizzu) यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना शुभेच्छा देताना म्हटले की, “भारत नेहमीच मालदीवचा एक विश्वासू विकास भागीदार राहिला आहे. मी दोन्ही देशांमधील उच्च-स्तरीय संबंध आणि लोकांमधील परस्पर संवाद वाढण्याचे कौतुक करतो. हे आमच्यातील मजबूत सहकार्य अधोरेखित करते.”
Congratulations to India on your 79th Independence Day. Our meeting earlier this week underscored the strength of our ties. We celebrate 60 years of diplomatic ties. pic.twitter.com/B0VlpHo9P4
— Vivian Balakrishnan (@VivianBala) August 15, 2025
सिंगापूरचे परराष्ट्र मंत्री विवियन बालाकृष्णन (Vivian Balakrishnan) यांनी देखील भारताला स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांच्या मजबुतीवर भर दिला.ते म्हणाले, “भारताला ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा. या आठवड्यात झालेल्या मंत्रिस्तरीय बैठकीने आमच्या संबंधांच्या दृढतेची पुष्टी केली आहे. आम्ही आमच्या राजनयिक संबंधांच्या ६० वर्षांची सांगता साजरी करत आहोत.”
You are cordially invited on the auspicious occasion of celebration of the 79th Independence Day of India 2025. The Chief Guest of honour on this occasion will be Professor K K Aggarwal, President, South Asian University, New Delhi, India.
Prof. K K Aggarwal, President, South… pic.twitter.com/oUaaoGXsJv
— South Asian University (@SouthAsianUni) August 14, 2025
नेपाळच्या परराष्ट्र मंत्री आरजू राणा देउबा (Arju Rana Deuba) यांनी त्यांच्या भारतीय समकक्ष एस. जयशंकर यांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देताना म्हटले, “नेपाळ भारतासोबतच्या दीर्घकालीन आणि टिकाऊ भागीदारीला खूप महत्त्व देतो.” शुक्रवारी(दि.१५), त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून लिहिले, “या स्वातंत्र्यदिनी, आम्ही भारतातील जनतेच्या सततच्या समृद्धीची प्रार्थना करतो. भारत हा लोकशाहीचा एक तेजस्वी आदर्श ठरला आहे आणि जगभरातील देशांना प्रेरणा देत आहे.”
(हेही वाचा – Meteorological Department : मुंबईसह ‘या’ विभागात पुढील ४ दिवस मुसळधार पावसाचा इशारा)
अमेरिकेकडून, परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ (Marco Rubio) यांनी भारताच्या स्वातंत्र्यदिनी भारताला हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांनी एका निवेदनात म्हटले, “भारत आणि अमेरिका एकत्र काम करत आजच्या आधुनिक आव्हानांना सामोरे जातील आणि दोन्ही देशांसाठी उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करतील.” ते पुढे म्हणाले, “नवी दिल्ली आणि वॉशिंग्टन यांच्यातील ऐतिहासिक संबंध अत्यंत महत्त्वाचे आणि दूरगामी परिणाम करणारे आहेत.”
हेही पहा –


