Pravin Pardeshi यांची धाराशिवची ‘बस’ चुकणार?

निवृत्तीनंतर आता प्रवीण परदेशी (Pravin Pardeshi) यांची राजकीय क्षेत्रात काम करण्याची इच्छा असल्याचे बोलले जात आहे.

217
Pravin Pardeshi यांची धाराशिवची ‘बस’ चुकणार?

माजी सनदी अधिकारी प्रवीण सिंह परदेशी (Pravin Pardeshi) भाजपाच्या वाटेवर असून ते धाराशिव लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. मात्र त्यांना थोडा उशीर झाला असून त्यांची लोकसभेची ‘बस’ चुकणार का? असा प्रश्न केला जात आहे. (Pravin Pardeshi)

अनेक महत्वाची पदे आणि खाती सांभाळली

१९८५ च्या आयएएस महाराष्ट्र केडरचे, प्रवीण परदेशी (६३) (Pravin Pardeshi) सध्या राज्य सरकारच्या ‘मित्रा’ या महत्वाकांक्षी प्रकल्पावर मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते निकटवर्तिय म्हणून ओळखले जातात. फडणवीस यांच्या काळात प्रवीण परदेशी (Pravin Pardeshi) यांनी मुख्यमंत्री सचिवालयाचा कारभार सांभाळला आहे. लातूरच्या भूकंपानंतर प्रवीण परदेशी (Pravin Pardeshi) लातूर जिल्हाधिकारी पदापासून ते मुंबई महापालिका आयुक्त पदापर्यंत अनेक महत्वाची पदे आणि खात्यांचा कार्यभार सांभाळला आहे. (Pravin Pardeshi)

भाजपामध्ये प्रवेश करणार?

निवृत्तीनंतर आता प्रवीण परदेशी (Pravin Pardeshi) यांची राजकीय क्षेत्रात काम करण्याची इच्छा असल्याचे बोलले जात आहे. येत्या २० मार्चला ते भाजपामध्ये प्रवेश करणार आहेत, अशीही चर्चा असून धाराशिव लोकसभेसाठी तयारी केल्याचे समजते. (Pravin Pardeshi)

(हेही वाचा – Lok Sabha Election 2024: लोकसभेसोबत महाराष्ट्रात विधानसभेचीही पोटनिवडणूक, केंद्रीय निवडणूक आयोगाची घोषणा)

भाजपा ‘स्थानिक’ पाटलांचा विचार करणार की एका ‘परदेशी’चा

प्रवीण परदेशी (Pravin Pardeshi) यांना थोडा उशीर झाला आणि लोकसभेची बस चुकणार का? हा प्रश्न करण्याचे कारण असे की, जेमतेम दीड महिन्यापूर्वी, ऐन निवडणुकीच्या तोंडावर धाराशिवमधील काँग्रेसचे नेते, माजी मंत्री बसवराज पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छाही व्यक्त केली आहे. त्याचबरोबर माजी राज्यमंत्री, विद्यमान आमदार राणाजगजितसिंह पाटील हेदेखील धारशिवमधून लोकसभेसाठी इच्छुक आहेत. बसवराज यांच्या भाजपा पक्षप्रवेशाने धारशिवमध्ये काँग्रेसची अवस्था अत्यंत बिकट झाली असून परदेशी (Pravin Pardeshi) यांना या दोन पाटलांच्या स्पर्धेत उतरावे लागेल. त्यामुळे धाराशिवमधून भाजपा ‘स्थानिक’ पाटलांचा विचार करणार की एका ‘परदेशी’ (Pravin Pardeshi) अधिकाऱ्याचा यावर त्यांचे राजकीय भवितव्य अवलंबून असेल. (Pravin Pardeshi)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.