पिंपरी-चिंचवडमधील शाळेत मुलींच्या स्वछतागृहात CCTV कॅमेरे

302
पिंपरी-चिंचवड शहरातील जय हिंद हायस्कूलमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्कूल प्रशासनानेच मुला – मुलींच्या स्वच्छतागृहात चक्क CCTV कॅमेरे बसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सुरक्षेसाठी केला हा प्रकार 

विद्यार्थ्यांच्या सिक्युरिटीचे कारण देत आम्ही स्कूलच्या स्वच्छतागृहात CCTV कॅमेरे बसवले, असा दावा शाळेच्या प्रशासनाने केला आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या सेक्युरिटीचे कारण पुढे करत असताना मुलांच्या स्वच्छतागृहात प्रायव्हसीचा विसर जय हिंद स्कूल प्रशासनाला पडला आहे. जय हिंद स्कूलमधील स्वच्छतागृहाचा सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर वायरल झाल्यानंतर पिंपरी चिंचवड महापालिकेचे शिक्षण विभाग देखील खडबडून जागा झाला. शिक्षण अधिकाऱ्यांनी जय हिंद हायस्कूलमध्ये जाऊन गर्ल्स अँड बॉईज स्टुडन्ट टॉयलेटचे सीसीटीव्ही कॅमेरे लगेच काढले आहेत. तसेच या प्रकरणात स्कूल प्रशासनाला नोटीस देऊन या सर्व घटनेची चौकशी करणार असल्याची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांनी दिली आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.