धक्कादायक! २०२१ हे वर्ष बांगलादेशी हिंदूंसाठी का ठरले विध्वंसक? वाचा…

82

बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदूंसाठी २०२१ वर्ष अत्यंत वेदनादायी ठरले. ऑक्टोबर २०२१ मध्ये दुर्गापूजेच्या काळात हिंदूंवर मोठ्या प्रमाणात होणारे अत्याचार जगाने पाहिले. तेथील धर्मांध मुसलमानांनी हिंदूंच्या मंदिरांवर आणि दुर्गादेवीच्या मंडपांवर हल्ले केले. ‘बांगलादेश जातिया हिंदू मोहजोत’ संघटनेने वर्ष २०२१ मध्ये अल्पसंख्यांक हिंदूंवरील अत्याचारांची आकडेवारी घोषित केली आहे.

मुसलमानांच्या धमक्यांमुळे हिंदू असुरक्षित

या आकडेवारीनुसार मुसलमानांनी २०२०-२१ मध्ये ३०१ हिंदूंची हत्या केली. २०२० मध्ये १४९, तर २०२१ मध्ये १५२ जण मारले. मुसलमानांच्या जमावाने हिंदूंवर १ हजार ८९८ वेळा हल्ले केले. ही संख्या मागील वर्षांच्या तुलनेत ३०० टक्क्यांनी अधिक आहे. २०२० आणि २०२१ मध्ये एकूण २५५ हिंदूंचे अपहरण करण्यात आले. त्यापैकी २०२१ चा आकडा हा १५१ आहे. अपहरण झालेल्या लोकांपैकी ८० टक्के लोक मुली किंवा महिला होत्या. मुसलमानांनी २०२१ मध्ये २ हजार १३० हिंदू देवतांच्या मूर्तींची तोडफोड केली. ही संख्या २०२० च्या तुलनेत ५०० टक्के (५ पटींनी) अधिक आहे. २०२१ मध्ये २७३ मंदिरांवर हल्ले करण्यात आली, जी २०२० च्या तुलनेत ७०० टक्क्यांनी वाढली आहेत. २०२१ मध्ये ३ हजार २५६ हिंदू कुटुंबांना लुटलेे, जे २०२० च्या तुलनेत ५०० टक्क्यांनी वाढले आहे. २०२१ मध्ये १ लाख २३ हजारहून अधिक कुटुंबांनी नोंदवले आहे की, देशातील मुसलमानांच्या धमक्यांमुळे त्यांना असुरक्षित वाटत आहे, जे मागील वर्षाच्या तुलनेत २० पटींहून अधिक आहे.

(हेही वाचा – ‘लालपरी’ची सेवा सुरु करण्यासाठी एसटी महामंडळानं घेतला ‘हा’ मोठा निर्णय)

अत्याचारांमुळे हिंदू समाजाचे नुकसान

केवळ या एकाच वर्षात मुसलमानांच्या हल्ल्यात तब्बल १ लाख ३५ हजाराहून अधिक घरे, मंदिरे आणि व्यवसाय यांची हानी झाली आहे. २०२१ मध्ये बांगलादेशात ४६ हिंदू महिलांवर बलात्कार करण्यात आला आणि ४११ हून अधिक हिंदू महिलांचा विनयभंग अथवा त्यांच्यावर शारीरिक आक्रमणे करण्यात आली. मुसलमानांकडून ३२ हिंदूंना गोमांस खाण्यास भाग पाडले गेले. २०२१ मध्ये किमान ९ हजार हिंदू कुटुंबांना धर्मांधांनी बांगलादेश सोडण्यास भाग पाडले, जे मागील वर्षाच्या तुलनेत ५ पट अधिक आहे. एकंदरीत धर्मांध टोळ्यांनी केलेल्या अत्याचारांमुळे यावर्षी हिंदू समाजाचे जवळपास १ हजार १४६ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.