-
खास प्रतिनिधी
ऐतिहासिक व्यक्तिमत्व असलेले छत्रपती संभाजी महाराज किंवा सामाजिक क्षेत्रातील थोर समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित चित्रपटावरून (Movies) जो काही वाद झाला तसा वाद यापुढे होऊ नये यासाठी राज्य शासनाने दोन समित्या गठित केल्या आहेत. या छाननी आणि निवड समित्यांनी मान्यता दिल्यानंतरच यापुढे चित्रपटाला अनुदान मंजूर केले जाईल, असे सांगण्यात आले.
शासन निर्णय जारी
राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने महाराष्ट्रातील ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक, कला व क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट (Movies), माहितीपट, लघुपट यांना सहाय्यक अनुदान देण्याबाबत छाननी समिती आणि निवड समिती गठित करण्याबाबतचा शासन निर्णय बुधवारी २३ एप्रिल २०२५ या दिवशी जारी केला आहे.
(हेही वाचा – BMC जिमखान्याच्या जागेवर उभारणार टाऊनहॉल जिमखाना, महालक्ष्मी येथे उभारणार क्रीडाभवन; कसे असेल जाणून घ्या)
टप्प्यानुसार निधी
छाननी समिती ही व्यवस्थापकीय संचालकांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली असून या समितीची कार्यकक्षा प्रस्तावांची छाननी करण्यापर्यंतच असेल. तसेच प्रस्तावांचे तांत्रिक व आर्थिक मुल्यांकन करणे, प्रस्ताव शासनाच्या मान्यतेसाठी पाठविणे, शासन-खाजगी चित्रपट (Movies) तसेच माहितीपट-लघुपट निर्मिती विहित कालावधीत पूर्ण होतील यावावत कार्यवाही करणे, शासनाने विहीत केलेल्या टप्प्यानुसार निधी वितरणाची कार्यवाही करणे आणि छाननी झाल्यानंतर ही समिती सर्व प्रस्ताव निवड समितिकडे पाठवतील.
चित्रपट विषय व लांबी निश्चिती
निवड समिती याबाबत अभ्यास करून पुढील कार्यवाही पूर्ण केले जाईल. महाराष्ट्रातील ऐतिहासिक, सामाजिक व शैक्षणिक कला व क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींच्या जीवनावर आधारित मराठी चित्रपट (Movies) माहितीपट-लघुपट यासाठी विषय व लांबी निश्चित करणे, महामंडळाकडून प्राप्त छाननी केलेले प्रस्ताव अंतिम करणे, छाननी समितीकडून शिफारस करण्यात आलेल्या चित्रपटाच्या मुल्यांकनास अंतिम करणे अथवा फेरआढावा घेणे आणि वेळोवेळी चित्रीकरणावावतचा प्रगती अहवाल घेणे अशी निवड समितीची कार्यकक्षा आहे. त्यामुळे चित्रपटाचा विषय आणि लांबी ठरवणे आणि वेळोवेळी चित्रीकरणावावतचा प्रगती अहवाल यामुळे चित्रपट किंवा माहितीपटावर शासनाचे नियंत्रण असेल, अशी चर्चा होत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community