Sharad Pawar Resigns: निवड समितीने एकमताने पवारांचा राजीनामा फेटाळला

राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन समितीचा हा निर्णय जाहीर केला.

117
Sharad Pawar Resigns
Sharad Pawar Resigns: निवड समितीने एकमताने पवारांचा राजीनामा फेटाळला

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या शरद पवार यांच्या निवृत्तीच्या निर्णयावर समितीकडून आज सर्वानुमते एक निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार शरद पवार (Sharad Pawar Resigns) यांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा असे सर्वानुमते ठरवण्यात आले आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी पत्रकार परिषद घेऊन समितीचा हा निर्णय जाहीर केला.

(हेही वाचा – Sharad Pawar Resigns: राष्ट्रवादीची ‘पॉवर’ कोणाच्या हातात? लवकरच निर्णय होण्याची शक्यता)

काय म्हणाले प्रफुल्ल पटेल?

“साहेबांनी निवृत्ती जाहीर (Sharad Pawar Resigns) केल्यापासून सर्वत्र एकच गोंधळ उडाला. आम्हा कोणालाही विश्वासात न घेता साहेबांनी अचानक आपल्या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. मात्र आमच्यापैकी कोणालाही त्यांचा तो निर्णय मान्य नाही. त्यांनी निर्णय जाहीर केल्यापासून अनेक नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा आम्हाला फोन आला. केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेते नाही तर राज्यातील अनेक पक्षातील नेत्यांची देखील हीच इच्छा होती की साहेबांनी इतक्यात निवृत्ती घेऊ नये. अशातच सर्व परिस्थितीचा विचार करून १५ ते १६ जणांच्या आमच्या समितीने एकमताने ‘साहेबांनी आपल्या निवृत्तीचा निर्णय मागे घेऊन पुन्हा पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यावी’ असा निर्णय घेतला आहे. सगळ्यांनी मिळून घेतलेला हा निर्णय घेऊन आम्ही लवकरच शरद पवार साहेबांकडे जाऊन त्यांना आमच्या निर्णयाचा विचार करण्याची विनंती करणार आहोत.” अशा शब्दांमध्ये त्यांनी पत्रकारांसमोर आपली बाजू मांडली.

आता या सर्व प्रकरणावर स्वतः शरद पवार कोणता निर्णय घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

हेही पहा – 

मंगळवार २ मे २०२३ रोजी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar Resigns) यांनी अचानक आपल्या निवृत्तीची (Sharad Pawar Resigns) घोषणा केली. ही गोष्ट खूप अनपेक्षित असल्याने संपूर्ण राज्यातील राजकीय वर्तुळातून या निर्णयाचे पडसाद उठतांना दिसले.

शरद पवार (Sharad Pawar Resigns) यांनी आपला राजीनामा मागे घ्यावा यासाठी अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आक्रमक झाले होते. काही कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केले होते, तर काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वतःच्या रक्ताने शरद पवार यांना पत्र लिहून राजीनामा मागे घेण्याची विनंती केली होती. या सगळ्या कार्यकर्त्यांची समजूत काढण्यासाठी स्वतः शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण सेंटरच्या बाहेर येऊन त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी त्यांच्याशी संवाद साधत ‘मी तुमच्या भावनांचा आदर करतो असे सांगितले होते.’

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.