मी पुन्हा येईन म्हटल्यावर येतोच, मग कसा येतो हे…; देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान

180
मी पुन्हा येईन म्हटल्यावर येतोच, मग कसा येतो हे...; देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
मी पुन्हा येईन म्हटल्यावर येतोच, मग कसा येतो हे...; देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान

‘मी पुन्हा येईन’ ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. कारण पुन्हा एकदा फडणवीस यांनी ‘मी पुन्हा येईन’ असे म्हणत ‘मग कसा येतो, हे तुम्हाला देखील माहित आहे,’ असे सूचक विधान देवेंद्र फडणवीस गुरुवारी केले. चंदगडमधील निट्टूर गावात देवेंद्र फडणवीसांनी हे सूचक विधान केले.

देवेंद्र फडणवीस असे का म्हणाले?

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी, ५ मेला कोल्हापुरातील सीमाभागात दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी चंदगडमधील निट्टूर गावातील नरसिंह मंदिराला अचानक भेट देवून देवाचे दर्शन घेतले. यावेळी ते जनतेशी संवाद साधताना म्हणाले की, ‘इथले एकदा पाहून मन भरत नाही. त्यामुळे मी पुन्हा येणार आहे. तुम्हाला माहितीये मी पुन्हा सांगतो, मी पुन्हा येईन, तेव्हा मी नक्कीच येतो. मग कसा येतो हेही तुम्हाला माहिती आहे.’

(हेही वाचा – कर्नाटकात भाजपाचेच सरकार येणार – देवेंद्र फडणवीस)

२०१९च्या निवडणुकीच्यावेळी ‘मी पुन्हा येईन’ अशी घोषणा देवेंद्र फडणवीसांनी केली होती. मात्र त्यानंतर राज्यातले समीकरण बदलून महाविकास आघाडीची सत्ता आली होती. त्यामुळे सत्तेत पुन्हा येण्याचे स्वप्न फडणवीसांचे भंगले. त्यामुळे विरोधक मी पुन्हा येईन या घोषणेवरून फडणवीसांना डिवचू लागले. यावर फडणवीस कधीच काही बोलले नाही. पण अडीच वर्षांत महाविकास आघाडीला त्यांनी केलेल्या घोषणेची प्रचिती करून दाखवून दिले आणि ते पुन्हा सत्तेत आले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.