सुरक्षारक्षक आपलं काम करत होते ; Amol Mitkari यांच्या आंदोलनावर मंत्री प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया

विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या P.A. ला प्रवेश नाकारल्यामुळे आंदोलन केल्यानंतर या प्रकरणावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.

150
सुरक्षारक्षक आपलं काम करत होते ; Amol Mitkari यांच्या आंदोलनावर मंत्री प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया
सुरक्षारक्षक आपलं काम करत होते ; Amol Mitkari यांच्या आंदोलनावर मंत्री प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया

विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या P.A. ला प्रवेश नाकारल्यामुळे आंदोलन केल्यानंतर या प्रकरणावर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे.मंत्री सरनाईक म्हणाले, “कालची परिस्थिती ही लोकप्रतिनिधी म्हणून वावरत असताना लज्जास्पद होती. शेवटी ते सुरक्षा रक्षक आहेत. सुरक्षा रक्षक आपलं काम करत आहेत.त्यांना त्यांचं काम करू द्यावं, हे माझ मत आहे. कालचा प्रकार दुर्देवी होता,” असे त्यांनी सांगितले.(सुरक्षारक्षक आपलं काम करत होते)

(हेही वाचा – “आमदारांचे खून पडले तरी …” ; विधानभवनातील राड्यावर Raj Thackeray यांची प्रतिक्रिया काय ?)

‘सुरक्षा व्यवस्था महत्त्वाची’

मंत्री सरनाईक यांच्या या वक्तव्यामुळे विधानभवनातील सुरक्षा रक्षकांचे मनोबल उंचावले असून, आमदारांनी नियमांचे पालन करावे असा अप्रत्यक्ष संदेश त्यांनी दिला आहे.(सुरक्षारक्षक आपलं काम करत होते)

(हेही वाचा – Bihar मध्ये पावसाचा कहर; २४ तासांत १७ बळी, हिमाचलला १२०० कोटींचा फटका, अमरनाथ यात्रेवरही झाला परिणाम)

अमोल मिटकरी यांनी विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावरच ठिय्या आंदोलन करत आहेत. “जोपर्यंत माझ्या P.A. ला सोडत नाही, तोपर्यंत हलणार नाही,” असा पवित्रा घेत त्यांनी सुरक्षा यंत्रणेला धारेवर धरले होते.या प्रकरणामुळे विधानभवनातील सुरक्षा नियम, लोकप्रतिनिधींचा वावर आणि शिस्त यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

हेही पहा

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.