MLAs Study Tour : राज्यातील आमदार निघाले लंडनला…

82
MLAs Study Tour : राज्यातील आमदार निघाले लंडनला...

ऐरवी परस्परांची उणीधुणी काढणारे राज्यातील सर्वपक्षीय आमदार आता एकत्रितपणे लंडनच्या दौऱ्यावर (MLAs Study Tour) निघाले आहेत. विधानपरिषद आणि विधानसभेच्या २२ आमदारांचा यात समावेश असून, ते तीन युरोपीय देशांचा अभ्यासदौरा करणार आहेत.

महाराष्ट्र विधानमंडळाच्या दोन्ही सभागृहांच्या सदस्यांसाठी २४ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर या कालावधीत ३ युरोपीय देशांच्या अभ्यासदौऱ्याचे (MLAs Study Tour) आयोजन करण्यात आले आहे. या अभ्यासदौऱ्यात २२ सदस्य सहभागी झाले असून, ६ अभ्यासभेटी, बैठका होणार आहेत. या परदेश अभ्यासदौऱ्याला केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची मान्यता प्राप्त झाली आहे.

(हेही वाचा – MLA Disqualification : शिवसेनेकडून सहा हजार पानांचे लेखी उत्तर विधानसभाध्यक्षांकडे सादर)

अभ्यासदौऱ्यावरील (MLAs Study Tour) शिष्टमंडळाचे नेतृत्व विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे करणार आहेत. फ्रॅंन्कफर्ट (जर्मनी), ॲमस्टरडॅम (नेदरलँड) आणि लंडन (यु.के.) या शहरांना अभ्यासदौऱ्यावरील आमदारांचे शिष्टमंडळ भेट देईल. एकूण २२ सदस्यांमध्ये निम्म्या संख्येने म्हणजे ११ महिला आमदारांचा समावेश आहे, अशी माहिती गोऱ्हे यांनी दिली.

कशाचा अभ्यास करणार?

– अभ्यासदौऱ्यात (MLAs Study Tour) प्रारंभी फ्रॅंन्कफर्ट येथे सामाजिक, सांस्कृतिक तसेच कृषी आणि दुग्धउत्पादन क्षेत्रातील तज्ज्ञांबरोबर, तसेच भारताचे उच्चायुक्त यांच्यासमवेत बैठक होईल. त्याचप्रमाणे जर्मनीत स्त्री-पुरुष समानतेसाठी कार्य करणाऱ्या अभ्यासगटाबरोबर चर्चा-संवाद आयोजित करण्यात आला आहे.
– ॲमस्टरडॅम येथे देखील नेदरलॅंडच्या विविध क्षेत्रातील तज्ञांबरोबर तसेच संयुक्त राष्ट्र महिला आणि हक्क समानता विचारमंच सदस्यांसोबत अभ्यासभेट, चर्चा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी भारताचे नेदरलॅंडमधील राजदूत यांचीही अभ्यासभेटीवरील सदस्य भेट घेतील.
– लंडन येथे देखील भारताचे लंडनमधील उच्चायुक्त, संयुक्त राष्ट्र महिला आणि हक्क समानता विचारमंच, लंडनमधील मराठी मंडळाचे पदाधिकारी, यु.के. पार्लमेंट मधील राष्ट्रकुल संसदीय मंडळ मुख्यालय आणि महासचिव यांच्या समवेत देखील अभ्यासभेट आयोजित करण्यात आली आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.