शेवटच्या सभेला भावनिक होतील, कदाचित काहींच्या डोळ्यात अश्रू येतील, पण… काय म्हणाले Ajit Pawar ?

अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या लोकसभा निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली असून, बारामतीतमध्ये सभांचा धडाका लावला आहे

120
शेवटच्या सभेला भावनिक होतील, कदाचित काहींच्या डोळ्यात अश्रू येतील, पण... काय म्हणाले Ajit Pawar ?

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha election 2024) सध्या जोरदार तयारी सुरू असून, राज्यभरात प्रचार सभांचा धूम धडाका लागला आहे. अशातच बारामतीच्या लढतीकडे सर्व महाराष्ट्रवासीयांचे लक्ष्य लागून राहिले आहे. यामध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टी (NCP) आणि पवार कुटुंबात फुट पडल्यानंतर पहिल्यांदाच काका आणि पुतण्या निवडणुकीत आमने-सामने आले आहेत. बारामतीमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादी गटाकडून सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे (Supriya Sule) रिंगणात आहेत. अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांच्या लोकसभा निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली असून, बारामतीत सुनेत्रा पवार यांच्यासाठी सभा घेतली.  (Ajit Pawar)

(हेही वाचा – Thane Election 2024: ठाणे जिल्ह्यात निवडणूक कर्तव्यार्थ असलेले अधिकारी, कर्मचारी, पोलीस मतदान कसे करणार? वाचा सविस्तर…)

या सभेमध्ये अजित पवारांनी कार्यकर्त्यांना चांगलेच धारेवर धरले. राष्ट्रवादी कॉंग्रेसने अनेक पदाधिकारी अद्यापही कामाला लागले नाहीत. त्यांनी पूर्ण ताकदीने कामाला लागवं अशा सूचना ही अजित पवारांनी दिल्या. एकाच बाजूनी उभं रहा असं आवाहन देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केलं. (Ajit Pawar)

(हेही वाचा – Devendra Fadnavis: महादेव जानकर म्हणजे महाराष्ट्राच्या खजान्याची किल्ली: फडणवीसांनी केले मोदींसमोरच कौतुक )

“आज शनिवार आहे, मारूतीरायाचं वार आहे. स्वतःच्या मनाला ईचारा आणि मला खरं खरं एका प्रश्नाचं उत्तर द्या. तिकडच्या (सुप्रिया सुळे) सभेला गेले आणि इकडच्या सभेला आले असे किती जण आहेत. त्यांनी हात वर करा”, अजित पवार यांनी असं विचारताच सभेतही हास्यकल्लोळ उडाला. दरम्यान २-४ कार्यकर्त्यांनी हात वर केले. असं करू नका. सगळ्या दगडावर पाय नका रे ठेऊ. तुम्ही कुठली तरी एक बाजू पक्की करा. माझी तुम्हाला विनंती आहे. आता निवडणुकीच्या काळात शेवटच्या सभेला लोकं भावनिक होतील, कदाचित काहींच्या डोळ्यात अश्रु येतील. भावनिक होऊ नका शेवटी प्रपंचाचा प्रश्न आहे. असं विधान अजित पवार यांनी बारामतीच्या (Baramati) सभेत केले.  (Ajit Pawar)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.