विरारच्या गावात सापडलेल्या बिबट्याला कायमचे अपंगत्व

158

विरारच्या काशीद कोपर गावात मार्च महिन्याच्या अखेरिस जेरबंद झालेल्या जखमी बिबट्याला कायमचे अपंगत्व  आले आहे. अंदाज पाच-सहा वर्षांच्या नर बिबट्याला गँगरीनच्या संसर्गापासून वाचण्यासाठी एक पायच कापावा लागण्याची नामुष्की पशुवैद्यकीय डॉक्टरांवर ओढावली. शुक्रवारी सकाळी बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात या बिबट्यावर शस्त्रक्रिया करुन त्याचा समोरचा डावा पाय काढला गेला. आता हा बिबट्या कायमचा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात जेरबंद राहणार आहे.

leopard

विरारच्या या गावांत पहिल्यांदाच बिबट्या आढळला

३० मार्च रोजी विरारच्या काशीद कोपर या गावात पहिल्यांदाच बिबट्याचे दर्शन घडल्याने गावकरी घाबरले. हा बिबट्या भर दिवसा पाण्याच्या टाकीवर बसल्याचे कित्येक गावक-यांनी पाहिले. या गावक-यांना पाहूनही बिबट्या घाबरला नाही उलट लंगडतच तो निघून गेला. गावक-यांनी व वनविभागाने नजीकच्या डोंगराळ भागांतून बिबट्याला जेरबंद केले आणि तातडीने त्याला उपचारांसाठी बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणले गेले. अन्यथा संसर्ग वाढला असता. बोरिवली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणल्यानंतर त्याच्या समोरच्या एका पायात अडकलेली लोखंडी तार काढली गेली. हा बिबट्या रानडुक्करांसाठी जंगलात लावल्या जाणा-या फासात अडकला होता. या फाश्यातून बिबट्याने आपला जीव कसाबसा वाचवला परंतु त्याला समोरील एका पायाला जखम झाली. या जखमेवर औषधोपचार सुरु असले तरीही त्याच्या जीवावरचा धोका टाळण्यासाठी शस्त्रक्रिया करणे गरजेचे असल्याचे उद्यानातील पशुवैद्यकीय डॉक्टरांनी ठरवले, अशी माहिती सिंह व व्याघ्र सफारीचे अधीक्षक विजय बारब्दे यांनी दिली. जखमेमुळे बिबट्याच्या पंज्याला जखम झाली होती. परिणामी, शरीरातून पंज्यापर्यंत रक्तपुरवठा कमी होत होता. पायाला वरच्या बाजूलाही जखमेतील गँगरीनमधील संसर्ग पसरण्याची भीती होती. त्याला जगण्यासाठी एक पाय कापावा लागला, अशी माहिती बारब्दे यांनी दिली. पुढील दहा दिवस बिबट्याला वैद्यकीय निगराणीखाली ठेवले जाईल. दररोज ड्रेसिंग होईल, असेही ते म्हणाले.

(हेही वाचा जागतिक वसुंधरा दिवस : गूगलचे खास डूडल!

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.