Ajit Pawar VS Chhagan Bhujbal : भुजबळ पवार संघर्ष नक्की का आणि कधीपासून?

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर अध्यक्ष अजित पवार आणि मंत्री छगन भुजबळ या राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन बड्या नेत्यांमध्ये संघर्ष हा काही आजचा नसून तो फार जुना असल्याचे बोलले जाते.

61
Ajit Pawar VS Chhagan Bhujbal : भुजबळ पवार संघर्ष नक्की का आणि कधीपासून?
Ajit Pawar VS Chhagan Bhujbal : भुजबळ पवार संघर्ष नक्की का आणि कधीपासून?

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर अध्यक्ष अजित पवार (Ajit Pawar) आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) या राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) दोन बड्या नेत्यांमध्ये संघर्ष हा काही आजचा नसून तो फार जुना असल्याचे बोलले जाते. खरंतर या दोन्ही नेत्यांमध्ये असलेल्या या वादाला अनेक किनार आहेत. तसाच तो वाद तितकाच जुना सुद्धा आहे. त्याची पाळंमुळं ही थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपर्यंत जातात.

वादाला सुरुवात कधी झाली?

राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) स्थापना १९९९ साली झाल्यानंतर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे राज्यातले दुसऱ्या क्रमांकाचे नेते होते. पण कालांतरानं त्यांची जागा अजित पवार (Ajit Pawar) यांनी घेतली. हा नेतृत्व बदल होण्याच्या काळातच दोन्ही नेत्यांमध्ये वितुष्ट येत गेलं असं राजकीय वर्तुळात बोलले जाते. छगन भुजळांची राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये कारकीर्द, अनुभव पाहिला तर ते पहिले प्रदेशाध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री झाले. पण त्यानंतर शरद पवार जेव्हा खासदार म्हणून दिल्लीला गेले, त्यावेळेपासून अजित पवार (Ajit Pawar) यांचं पक्षातलं स्थान वाढलं. पक्षाचा कारभार हळूहळू त्यांच्या हाती जाऊ लागला. त्यानंतर शरद पवार स्वतः इतर कामांसाठी लोकांना अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे पाठवायला लागले. आजही प्रदेशाध्यक्ष कुणीही असलं तरी राज्यातले सर्व निर्णय अजित पवार यांच्याच कलेने घेतले जातात, हे राजकारणात असलेल्या सर्वांनाच माहित आहे. त्यामुळं दोन्ही नेत्यांमध्ये ज्येष्ठ आणि कनिष्ठ हा कळीचा मुद्दा नेहमीच राहिला आहे. (Ajit Pawar VS Chhagan Bhujbal)

२००४ च्या निवडणुकीत काँग्रेसचे कमी आमदार आले होते आणि राष्ट्रवादीचे जास्त होते. पण तरीही मुख्यमंत्री पद काँग्रेसकडे देण्यात आलं. भुजबळ तेव्हा उपमुख्यमंत्री झाले. तेव्हापासूनच अजित पवार (Ajit Pawar) आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यात संघर्ष सुरू झाला. पण राष्ट्रवादीतल्या शरद पवारांसारख्या खंबीर नेतृत्वामुळे त्यांच्यातल्या भांडण फारसं समोर आलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेसनं (NCP) नंतरच्या काळात रोटेशन पद्धतीनं उपमुख्यमंत्रिपद अनेक नेत्यांना दिलं. त्या काळात भुजबळ नाराज असायचे की अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत आणि भुजबळांकडे सार्वजनिक बांधकाम खातं होते. मागच्या काही वर्षांपूर्वी छगन भुजबळ आणि पवार या दोन्ही मोठ्या नेत्यांच्यामध्ये वाकयुद्ध देखील पाहायला मिळाले होते. त्याचाच परिणाम म्हणून की काय अजित पवारांना सिंचन घोटाळ्यात वाचवत दिल्लीच्या महाराष्ट्र सदन घोटाळ्यात भुजबळांना तुरुंगवास देखील भोगाव लागला असल्याचे भुजबळ खाजगीत देखील बोलून दाखवतात. (Ajit Pawar VS Chhagan Bhujbal)

(हेही वाचा – PM Narendra Modi यांचे Tejas मधून उड्डाण; म्हणाले, माझा आत्मविश्वास खूप वाढला)

जातीय राजकारणाचा फटका भुजबळांना पडला

सुरुवातीला दोन्ही नेत्यांमधला हा संघर्ष फार सुप्त होता, पक्षातल्या सर्व मराठा नेत्यांमध्ये शरद पवारांनी (Sharad Pawar) अजित पवारांना महत्त्व द्यायला सुरुवात केली, तेव्हा अजित पवार (Ajit Pawar) हे यापुढे कारभारी असतील हे स्पष्ट होत गेलं. त्यानंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस अधिकाधिक मराठाबहुल पक्ष होत गेला तेव्हा अजित पवारांची ताकद वाढत गेली आणि पक्षातल्या मराठेतर (बहुजन) नेत्यांची घुसमट वाढत गेली. त्यातले काही आता पक्ष सोडूनही गेले. मराठा राजकारण ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची (NCP) व्यवहारी गरज देखील होती. त्यामुळेच मराठा बहुल नेत्यांचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे पाहिलं जात होतं.

छगन भुजबळांप्रमाणेच कित्येक बहुजन नेते हे याच कारणामुळे पक्षाला रामराम करून इतर पक्षांची वाट चोखाळताना दिसले. म्हणतात ना इतिहास पुन्हा एकदा नव्याने समोर येतच असतो. तसंच आता पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षामध्ये उभी फूट पडल्यानंतर भलेही आज अजित पवारांबरोबर असलेले छगन भुजबळ सोबत जरी असले तरी मनाने मात्र नाहीत. हे त्यांच्याबरोबर ओबीसी चे आणि बहुजनांचे राजकारण करणारे नेते जाणून आहेत. (Ajit Pawar VS Chhagan Bhujbal)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.