PM Narendra Modi यांचे Tejas मधून उड्डाण; म्हणाले, माझा आत्मविश्वास खूप वाढला

78

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी शनिवार, २५ नोव्हेंबर रोजी बंगळुरू येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (एचएएल) च्या फॅसिलिटी सेंटरला भेट दिली. त्यावेळी त्यांनी तेजस (Tejas) विमानातून उड्डाण केले. यामुळे माझा आत्मविश्वास खूप वाढला, असा शब्दांत PM Modi यांनी कौतुक केले.

तेजसच्या मॅन्युफॅक्चरिंग हबची पाहणी केली

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी तेजसच्या मॅन्युफॅक्चरिंग हबची पाहणी केली. उड्डाणानंतर पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर पोस्ट केली. याविषयी बोलताना पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी ‘तेजसचे उड्डाण यशस्वीरीत्या पूर्ण केले. हा अनुभव अविश्वसनीय होता. या अनुभवाने आपल्या देशातील स्वदेशी क्षमतांवरील माझा आत्मविश्वास खूप वाढला आहे. यामुळे माझ्यामध्ये आपल्या राष्ट्रीय क्षमतेबद्दल अभिमान आणि आशावाद जागृत झाला आहे. देशाची संरक्षण सज्जता आणि स्वदेशीकरण वाढवण्यासाठी सरकारने उचललेल्या मोठ्या पावलांमध्ये तेजस विमानाचाही समावेश आहे. 2016 मध्ये पहिले विमान हवाई दलात समाविष्ट करण्यात आले होते. सध्या IAF चे दोन स्क्वॉड्रन, 45 स्क्वॉड्रन आणि 18 स्क्वॉड्रन LCA तेजस सोबत पूर्णपणे कार्यरत आहेत.

(हेही वाचा अमित शहांचा BRS सरकारवर हल्लाबोल; नोकरभरती, मोफत शिक्षणाची आश्वासने ठरली पोकळ)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.