UBT Yuva Sena : शिवसेना होतेय आदित्यमय

शिवसेना उबाठा गटाच्या सचिवपदी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची वर्णी लावल्यामुळे एकप्रकारे पक्षाच्या महत्वाच्या निर्णयात आदित्य ठाकरेंचे सहकारी सामील होणार आहे.

126
UBT Yuva Sena : शिवसेना होतेय आदित्यमय
UBT Yuva Sena : शिवसेना होतेय आदित्यमय
सचिन धानजी,मुंबई

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेतेपदी तसेच उपनेतेपदी अनेक पदाधिकाऱ्यांची वर्णी लागली गेली असून त्यामध्ये युवा सेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई, कार्यकारीणी सदस्य साईनाथ दुर्गे तसेच सुप्रभा फातर्पेकर यांची पक्षाच्या सचिवपदी तर कार्यकारीणी सदस्य शीतल देवरुखकर यांची पक्षाच्या उपनेतेपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे शिवसेना उबाठा गटाच्या सचिवपदी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची वर्णी लावल्यामुळे एकप्रकारे पक्षाच्या महत्वाच्या निर्णयात आदित्य ठाकरेंचे सहकारी सामील होणार आहे. त्यामुळे जुन्या पदाधिकाऱ्यांना नेतेपदी तसेच उपनेतेपदी नियुक्ती करताना त्यात युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांचीही वर्णी लागल्यामुळे एकप्रकारे हा पक्ष आदित्यमय झालेला पहायला मिळत आहे. (UBT Yuva Sena)

शिवसेनेने सन २०१८ पक्षाची बांधणी करताना कार्यकारीणीत अनेकांची वर्णी लावली होती. त्यात युवा सेनेचे कार्यकारीणी सदस्य सुरज चव्हाण यांना बढती देत त्यांना शिवसेना सचिव बनवण्यात आले. त्याबरोबरच मिलिंद नार्वेकर यांना सचिव बनवले गेले. तर ऍड अनिल परब यांची प्रवक्तेपदी नियुक्ती करताना विठ्ठल गायकवाड आणि रघुनाथ कुचिक यांची उपनेतेपदी निवड केली होती. त्यानंतर शिवसेनेत फुट पडल्यानंतर युवा सेनेचे अमोल किर्तीकर यांची शिवसेना नेतेपदी निवड करण्यात आली. त्यानंतर चार दिवसांपूर्वी शिवसेनेने नेते, उपनेते, सचिव व संघटकांची नावे जाहीर केली. यामध्ये शिवसेना सचिवपदी युवा सेनेचे वरुण सरदेसाई, साईनाथ दुर्गे आणि सुप्रभा फातर्पेकर यांची वर्णी लावली गेली. त्यामुळे शिवसेना उबाठा गटाच्या सचिवपदी सर्व युवासेचेचे पदाधिकारी आहे. याआधी सुरज चव्हाण आता वरुण सरदेसाई, साईनाथ दुर्गे आणि सुप्रभा फातर्पेकर यांची पक्षाच्या सचिवपदी निवड झाल्याने पक्षाच्या सर्व कारभारात युवा सेनेचेच वर्चस्व पहायला मिळणार आहे. (UBT Yuva Sena)

(हेही वाचा – Maharashtra Military School : जिल्हास्तरीय फूटबॉल स्पर्धेमध्ये महाराष्ट्र मिलिटरी स्कूलचा दणदणीत विजय  )

शिवसेना सचिव अनिल देसाई, विनायक राऊत यांना बढती देत शिवसेना नेते बनवल्याने आता शिवसेना सचिवपदी युवा सेनेचे चार पदाधिकारी आणि मिलिंद नार्वेकर व आदेश बांदेकर हीच मंडळी आहे. पक्षात नेतेपदापेक्षा सचिव पद हे महत्वाचे असून प्रत्यक्षात पक्षाच्या सर्व निर्णयात सचिवांची उपस्थिती राहणार असल्याने कोणतीही पक्षविरोधी भूमिका घेतल्यास त्याची माहिती आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागणार नाही. पक्षातील निष्ठावंतांची नेतेपदी वर्णी लावली गेली असली तरी सचिवपदी आपल्याच माणसांची वर्णी लावून एकप्रकारे पक्षात आदित्य ठाकरेंची नवीन टिम तयार केली जात आहे. शिवाय पक्षात आपल्याच माणसांद्वारे बारीक लक्ष ठेवून त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून सुरु असल्याचे बोलले जात आहे. (UBT Yuva Sena)

शिवसेनेत फुट पडल्यानंतर युवा सेनेचे कोषाध्यक्ष अमेय घोले, सचिव पूर्वेश सरनाईक, तर सक्रिय कार्यकारीणी सदस्य सिध्देश कदम, समाधान सरवणकर, राहुल कनाल आदी मंडळी सोडून गेले आहेत. त्यातच दुर्गा शिंदे यांची आकस्मित निधन झाले. त्यामुळे युवा सेनेची बांधणी करताना पक्षाची बांधणी करण्यासाठी युवा सेनेच्या पाच ते सहा पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या कामात मुख्य प्रवाहात आणून त्यांच्यावर आपल्या विचाराने पक्ष बांधणीची जबाबदारी सोपवण्यासाठी आदित्य ठाकरेंनी टाकण्यासाठी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची पक्षाच्या सचिवपदी वर्णी लावल्याचे बोलले जात आहे. (UBT Yuva Sena)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.