चीनमधून आयात चालणार नाही, टेस्लाने भारतात वाहन निर्मिती करावी; गडकरींची भूमिका

87

टेस्ला कंपनी जर भारतात कारखाना सुरू करून कारविक्री करीत असले तर स्वागत आहे. परंतु, चीनमधून कार आयात करून भारतात विक्री करायची हा योग्य प्रस्ताव नसल्याचे प्रतिपादन केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केले. टेस्ला कंपनी त्यांची वाहने भारतात आयात करून विकण्यास उत्सुक आहे. यासाठी टेस्लाने आयात शुल्कात कपात करण्यासाठी जवळपास वर्षभर दिल्लीतील अधिकाऱ्यांशी लॉबिंग केले होते. तर, दुसरीकडे भारतातील दर जगातील सर्वाधिक असल्याचे विधान मस्क यांनी यापूर्वीच केले आहे.

परदेशातल्या टेस्ला कारची भारतात होणार विक्री

तसेच टेस्लाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या “मेक इन इंडिया” च्या अनुषंगाने भारतात उत्पादन आणि रोजगार निर्मितीसाठी भारतातील त्यांच्या गुंतवणूक योजनेबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. मस्क यांना भारत सरकारने टेस्लाच्या कारवरील आयात शुल्क कमी करावे असे वाटते, जेणेकरून ते परदेशात बनवलेल्या टेस्ला कार भारतीय बाजारपेठेत सहज विकू शकतील. मात्र, मस्क यांच्या या मागणीला भारत सरकार तयार नसून, मस्क यांच्या दबावाचा कोणताही परिणाम होणार नसल्याचे केंद्र सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.

(हेही वाचा – औरंगाबादेत जमावबंदी नाही, राज ठाकरेंच्या सभेबद्दल काय म्हणाले पोलीस आयुक्त?)

चीनमधून भारतात आयात चालणार नाही

टेस्ला भारतात कार बनवण्याऐवजी येथे आयात केलेल्या कार विकू इच्छित आहे. भारत सरकारने इलेक्ट्रिक कारवरील आयात शुल्क कमी करावे, असे टेस्लाने अनेक मंचांवर म्हटले आहे. परंतु, अवजड उद्योग मंत्रालयाने टेस्ला कंपनीला सांगितले की, टेस्ला भारतात येईल आणि आधी कार बनवेल, त्यानंतर सवलतींचा विचार केला जाईल. चीनमधून आयात केलेली मालाची विक्री भारत स्वीकार करणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आलेय.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.