Telangana Assembly Election 2023 : एकूण ११९ जागांसाठी मतदान

बीआरएस, काँग्रेस आणि भाजपमध्ये मुख्य लढत

104
Telangana Assembly Election 2023 : एकूण ११९ जागांसाठी मतदान

आज म्हणजेच, गुरुवार, ३० नोव्हेंबर रोजी तेलंगणा येथे विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. तेलंगणाच्या निवडणुकांसह (Telangana Assembly Election 2023), या वर्षाच्या अखेरपर्यंत पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका पार पडत आहेत. त्यामुळे या निवडणुकांकडे २०२४ च्या लोकसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहीले जात आहे.

पाच राज्यांमध्ये निवडणूक पार

तेलंगणापूर्वी (Telangana Assembly Election 2023) छत्तीसगड, मिझोराम, मध्य प्रदेश आणि राजस्थान विधानसभेसाठी मतदान पार पडलं आहे. या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी येत्या ३ डिसेंबरला होणार आहे. तेलंगणात मुख्य लढत मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांचा पक्ष भारत राष्ट्र समिती (BRS), काँग्रेस (Congress) आणि भाजप (BJP) यांच्यात असल्याचं बोललं जात आहे.

(हेही वाचा – Ajit Pawar vs Sharad Pawar : लोकशाहीत बहुमताचा आदर करावा, अजित पवारांचा शरद पवारांना टोला)

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

राज्यातील (Telangana Assembly Election 2023) सत्ताधारी बीआरएसनं सर्वच्या सर्व ११९ जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत, तर भाजप स्वतः जागावाटप करारानुसार, १११ जागांवर निवडणूक लढवत आहे, उर्वरित आठ जागा अभिनेता पवन कल्याणच्या नेतृत्वाखालील जनसेनेसाठी सोडल्या आहेत. काँग्रेसनं आपल्या मित्रपक्ष कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीआय) ला एक जागा दिली आहे आणि उर्वरित ११८ जागांवर निवडणूक लढवत आहे.

(हेही वाचा – Indian Navy Demonstrations : सिंधुदुर्गवासीय अनुभवणार भारतीय नौदलाचा साहसी थरार)

लोकशाहीचा उत्सव साजरा करा; पंतप्रधान मोदींचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी X वर ट्वीट करत तेलंगणातील मतदारांना (Telangana Assembly Election 2023) आवाहन केलं आहे. ते म्हणाले की, “मी तेलंगणातील माझ्या सर्व बांधवांना रेकॉर्डब्रेक मतदान करण्याचं आणि लोकशाहीचा उत्सव साजरा करण्याचं आवाहन करतोय. विशेषतः पहिल्यांदा मतदान करणारे मतदार आणि तरुण मतदारांना आग्रह आहे की, त्यांनी आपला मतदानाचा अधिकार नक्की बजवावा.”

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.