तालिबान्यांचे सरकार स्थापन! तालिबानी – हक्कानी यांच्यात तणाव कायम?

पंतप्रधान पदावर मुल्ला मोहम्मद हसन अखूंद यांची निवड झाली आहे.

87

तालिबानी आणि हक्कानी यांच्या सत्तेच्या वाटपावरून वाद निर्माण झाला होता, त्यामुळे अफगाणिस्तानवर तालिबान्यांमध्ये सत्ता स्थापन करणे हे मोठे कोडे निर्माण झाले होते, अखेर मंगळवारी, ७ सप्टेंबर रोजी अफगाणिस्तानात सत्ता स्थापन करण्यात आली. तसेच मंत्रिमंडळाची स्थापनाही केली. यामध्ये पंतप्रधान पदावर मुल्ला मोहम्मद हसन अखूंद यांची निवड झाली आहे. तूर्तास मंत्रिपदाच्या वाटपांवरून तालिबान आणि हक्कानी ग्रुप यांच्यात समझोता झाला असला तरी सगळे काही आलबेल नाही, असेच चित्र आहे.

यासंबंधी तालिबान्यांनी पत्रकार परिषदेत मंत्रिमंडळाची घोषणा केली. तालिबानच्या प्रवक्त्याने मंत्रिमंडळाची माहिती दिली. अखूंद हे पंतप्रधान असतील तर ज्यांच्या नावाची पंतप्रधानपदासाठी चर्चा होती, ते मुल्ला बरादर हे उपपंतप्रधान असणार आहे. तालिबानच्या ह्या मंत्रिमंडळात हक्कानींना वजनदार मंत्रीपद मिळाले आहे. सिराजुद्दीने हक्कानी हे गृहमंत्री असणार आहेत. दमदार मंत्रिपद मिळावे म्हणून तालिबान आणि हक्कानींमध्ये तणाव निर्माण झालेला होता. अमीर मुताकी हे परराष्ट्र मंत्री असतील. अब्दूल सलाम हंफू यांनाही उपपंतप्रधान करण्यात आले आहे.

(हेही वाचा : आता आरोग्यमंत्री टोपेंनी दिला गणेशोत्सवावरून ‘डोस’!)

कोणाला कोणते मंत्रिपद?

  • मुल्ला मोहम्मद हसन अखूंद – पंतप्रधान
  • मुल्ला बरादर – उपपंतप्रधान
  • अब्दूल सलाम हंफू – उपपंतप्रधान
  • सिराज हक्कानी – गृहमंत्री
  • खैरउल्लाह खैरख्वा – माहिती मंत्री
  • अब्दूल हकीम – कायदामंत्री
  • अमीर मुत्तकी – परराष्ट्र मंत्रिपद
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.