Swami Govind Dev Giri Ji Maharaj : राजसत्ता आणि धर्मसत्तेला एकाच मंचावर आणण्याचे अद्भुत कार्य स्वामीजींनी केले; राहुल शेवाळे यांचे गौरवोद्गार

'स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक' आणि 'हिंदु जनजागृती समिती' यांच्या वतीने स्वामीजींच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने १४ फेब्रुवारी रोजी त्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.

185

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी चेतवलेल्या जाज्वल्ल्य हिंदुत्वाचा विचार आपण सर्वांनी पुढे नेण्याची खरी गरज आहे. हा वारसा स्वामी गोविंददेव गिरी महाराजांनी (Swami Govind Dev Giri Ji Maharaj) वयाच्या १७व्या वर्षांपासून पुढे चालवला आहे. पूर्वाश्रमीचे आचार्य किशोरजी ते देवगिरीजी महाराज असा प्रवास होईपर्यंत तुम्हा आम्हा सर्वांसाठी आदरणीय आहे. म्हणूनच त्यांच्या आयुष्याचा गौरव करणे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. हिंदू धर्माची पताका खांद्यावर वाहणाऱ्या स्वामीजींची श्रीमद भागवत, रामायण आणि आध्यात्मिक विज्ञानावर प्रवचन प्रसिद्ध आहे. सरस्वतीचा आशीर्वाद लाभलेल्या स्वामींकडून राष्ट्रकार्याची धुरा वाहण्यासाठी त्यांचे नेतृत्व, कर्तृत्व, संतत्व, श्रेष्ठत्व, विद्ववत्व आणि भक्तिलीनत्व आणि आचरत्व स्वयं सिद्ध आहे. राजसत्ता आणि धर्मसत्ता यांना एकाच मंचावर आणण्याचे अद्भुत कार्य स्वामीजींनी केले आहे, असे गौरवोद्गार शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी काढले.

बुधवार, १४ जानेवारीला दादर, मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकातील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात संपन्न झालेल्या स्वामीजींच्या अमृत महोत्सवाच्या सन्मान सोहळ्यात रणजीत सावरकर बोलत होते. हा कार्यक्रम ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) आणि ‘हिंदु जनजागृती समिती’ यांच्या वतीने स्वामीजींच्या ( Govind Dev Giri Ji Maharaj) भव्य आणि दिव्य कार्याप्रती कृतज्ञता म्हणून आयोजित करण्यात आला होता. या वेळी व्यासपीठावर श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज (Swami Govind Dev Giri Ji Maharaj), विधान परिषदेच्या उपसभापती आमदार नीलम गोऱ्हे, स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर, सुदर्शन वाहिनेचे संपादक सुरेश चव्हाणके, भाजपचे आमदार, अधिवक्ता आशिष शेलार, आमदार आणि भाजपचे प्रवक्ते अतुल भातखळकर आणि हिंदु जनजागृती समितीचे (Hindu Janajagruti Samiti) राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.’

(हेही वाचा Govind Dev Giri Ji Maharaj : जय श्रीराम म्हणत आपण घरी जाऊन झोपणार असू, तर पुन्हा दुष्टचक्र माथी बसायला वेळ लागणार नाही; रणजित सावरकर यांचा इशारा)

अयोध्येतील भव्य श्रीराम मंदिरात श्रीरामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना स्वामीजींमुळे शक्य झाली. स्वामीजी दुःखापासून अलिप्त इंद्रियनिग्रह असणारे असे आहेत. स्वामीजींच्या अमृतमहोत्सवाच्या कार्यक्रमाला कांची कामकोटि पीठ अध्यक्ष जगद्गुरु शंकराचार्य श्री जयेंद्र सरस्वती महाराज यांनी संपूर्ण कार्यक्रमाला उपस्थित राहून आशीर्वाद दिले, यातूनच परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरी महाराज (Swami Govind Dev Giri Ji Maharaj) यांची महती लक्षात येते. आजच्या कार्यक्रमाला स्वतः स्वामीजी उपस्थित राहिले म्हणून मी परमपूज्य स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी वंदन करतो आणि स्वतःला भाग्यवान समजतो कि हा कार्यक्रम माझ्या मतदारसंघात होत आहे, त्यामुळे खासदार म्हणून मी स्वतःला धन्य समजतो. स्वामीजींनी आम्हाला आशीर्वाद द्यावेत, त्याआधारे आम्ही राष्ट्रसेवा करू, असे खासदार राहुल शेवाळे म्हणाले.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.