Lok Sabha MP Suspension : लोकसभेच्या १४ खासदारांचे निलंबन

राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

258
Lok Sabha MPs Suspension : लोकसभेतील निलंबित खासदारांचे शतक; तीन खासदार निलंबित
Lok Sabha MPs Suspension : लोकसभेतील निलंबित खासदारांचे शतक; तीन खासदार निलंबित

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या नवव्या दिवशी गुरुवारी (१४ डिसेंबर) कामकाज सुरू झाले. मात्र विरोधी खासदारांनी संसदेच्या सुरक्षेबाबत गोंधळ घातला. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहात विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. दिवसभरात अनेकवेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. (Lok Sabha MP Suspension)

नवीन संसद भवनामध्ये बुधवारी दोन तरुणांनी घुसखोरी केल्याच्या घटनेनंतर गुरुवारी पुन्हा संसदेच्या दोन्ही सभागृहात हिवाळी अधिवेशनाचे कामकाज सुरू झाले. या घटनेचे पडसाद गुरुवारी लोकसभेत उमटले. यावेळी विरोधी पक्षांचे सदस्य आक्रमक झाले व त्यांनी या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी केली. यावरून विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेतून ९ काँग्रेस, २ सीपीएम, १ सीपीआय, २ डीएमके असे एकूण १४ खासदारांचे निलंबन केले. राज्यसभेतील तृणमूल काँग्रेसचा एक असे एकूण १५ खासदारांचे निलंबन करण्यात आले. दरम्यान लोकसभेचे कामकाज शुक्रवारी सकाळी ११ पर्यंत तहकूब करण्यात आले आहे. (Lok Sabha MP Suspension)

लोकसभेतील टीएन प्रतापन, हिबी इडन, एस. जोथिमनी, रम्या हरिदास आणि डीन कुरियाकोसे या काँग्रेसच्या खासदारांचे निलंबन करण्यात आले. यावेळी या १४ जणांनी सभागृहात चुकीची वर्तणूक केल्याबद्दल हिवाळी अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी लोकसभेतून निलंबन करण्यात आले. (Lok Sabha MP Suspension)

(हेही वाचा – Conversion of Tribals : आदिवासींच्या धर्मांतरणाला चाप लागणार; मंत्री मंगलप्रभात लोढांची ग्वाही)

विरोधी पक्षांच्या सदस्यांची जोरदार घोषणाबाजी

गुरुवारी सभागृह सुरू झाल्यानंतर दरम्यान लोकसभेत विरोधी पक्षांचे सदस्य आक्रमक झाले व त्यांनी या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी केली. या वरून विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. घुसखोरीच्या प्रकरणात झालेल्या सुरक्षेच्या त्रुटीवरून लोकसभेत चर्चा करण्याची मागणी केली. या घटनेवरून सभागृहात जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी लोकसभेतून ९ काँग्रेस, २ सीपीएम, १ सीपीआय, २ डीएमके असे एकूण १४ खासदारांचे निलंबन केले. (Lok Sabha MP Suspension)

दरम्यान, या घटनेचे पडसाद गुरुवारी राज्यसभेत उमटले. राज्यसभा खासदार डेरेक ओब्रायन यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सभागृहाच्या कामकाजात अडथळा आणल्याचा ठपका ठेवत राज्यसभेचे सभापती जगदीप धनकड यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. (Lok Sabha MP Suspension)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.