राज ठाकरेंना दिल्ली उच्च न्यायालयाचा दिलासा: ‘तो’ समन्स केला रद्द

183
Summons cancelled against Raj Thackeray Chhath Puja statement
राज ठाकरेंना दिल्ली उच्च न्यायालयाचा दिलासा: 'तो' समन्स केला रद्द

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना कथित भडकाऊ भाषण केल्याबद्दल झारखंडच्या बोकारो न्यायालयाने समन्स बजावले होते. मात्र ते दिल्ली उच्च न्यायालयाने रद्द केले आहे. न्यायमूर्ती जसमीत सिंह यांच्या खंडपीठाने या संदर्भात निर्णय दिला. विश्वास आणि धर्माबाबत बोलताना अधिक सावधगिरी बाळगावी लागते. त्याद्वारे एखाद्या व्यक्तीच्या विचारांना धक्का लावता येत नाही किंवा चिथावणी दिली जाऊ शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले आहे.

राज ठाकरे यांनी २००८ मध्ये केलेल्या एका भाषणात त्यांनी बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशात साजऱ्या होणाऱ्या छठपूजेवर वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते की, उत्तर भारतीयांचा छठपूजा हा सण म्हणजे नाटक आहे. त्याविरोधात झारखंडच्या बोकारो न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती.

(हेही वाचा – Nitesh Rane: संजय राऊत राजकारणातला लावारीस आहे का?, नितेश राणेंचा सवाल)

छठपूजा हा हिंदूंचा सण आहे आणि तो विशेषतः बिहार आणि पूर्व उत्तर प्रदेशमध्ये साजरा केला जातो. उच्च न्यायालयात ठाकरे यांची बाजू ज्येष्ठ वकील अरुणाभ चौधरी आणि अनुपम लाल दास यांनी मांडली. या कथित वक्तव्याशी संबंधित अनेक प्रकरणानंतर सर्वोच्च न्यायालयाने विविध राज्यांतून दिल्लीतील न्यायालयाकडे वर्ग केली होती. उत्सवावरील टिप्पणीबद्दल इतर सहा तक्रारींमध्ये ठाकरे यांना बजावलेले समन्स न्यायालयाने रद्द केले आहे. परंतु तक्रारींमध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला.

२००८ मध्ये झारखंडमधील बोकारो न्यायालयाने बजावलेले समन्स केंद्र किंवा झारखंड सरकारच्या पूर्वपरवानगी अभावी कायम ठेवता येणार नसल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. दरम्यान, न्यायालयाने ठाकरे यांच्याविरुद्ध कलम १५३ अ अन्वये दाखल केलेली फौजदारी तक्रार रद्द करण्यास नकार दिला. भारताची एकता विविध धर्म आणि भाषा यांच्या सहअस्तित्वात आहे, ते शतकानुशतके टिकून राहील, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.