NCP : बुधवार दुपारपर्यंत पक्षाचे नाव सुचवा; निवडणूक आयोगाचा शरद पवार गटाला अल्टिमेटम

234
निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आणि पक्षाचे चिन्ह घड्याळ हे अजित पवार गटाला देऊन शरद पवार यांच्या पक्षाला गट म्हणून मान्यता दिली आहे. या निर्णयाला शरद पवारांचा गट सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार आहे. मात्र निवडणूक आयोगाने त्यांच्या निर्णयात शरद पवार गटाला त्यांच्या पक्षाला काय नाव द्यायचे हे सुचवण्यासाठी बुधवार, ७ फेब्रुवारी दुपारपर्यंत अल्टिमेटम दिला आहे.

शरद पवार गटाला ‘मी राष्ट्रवादी काँग्रेस’ नाव?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आहे, असा महत्त्वपूर्ण निर्णय निवडणूक आयोगाने मंगळवारी घेतला. तसेच पक्षाचे नाव व घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांच्या गटाला देण्यात आले आहे. या निर्णयामुळे शरद पवार यांच्या गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. शरद पवार गटाकडे निवडणूक आयोगाच्या निकालाविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणे, नव्या पक्षाचे नाव आणि चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज करणे असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. दरम्यान आपल्या राजकीय गटाला कोणते नाव व चिन्ह द्यावे, यासाठी प्रस्ताव सादर करण्याची मुभा निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला दिली. बुधवारी दुपारपर्यंत शरद पवार गटाने तीन नावांचे पर्याय सादर करावे, असे आदेश आयोगाने दिले. शरद पवार गटाकडे महाराष्ट्रातील १५ आमदार, केरळमधील १ आमदार, लोकसभेचे ४ खासदार, विधानपरिषदेचे ४ आमदार आणि राज्यसभेचे ३ खासदार आहेत. शरद पवार गट त्यांच्या पक्षाला ‘मी राष्ट्रवादी काँग्रेस’ असे नाव सुचवेल, अशी सूत्रांची माहिती आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.