Konkan Politics : एखाद्याच्या घरात घुसून बेडरूमपर्यंत स्टिंग ?; बावनकुळे भडकले अन् म्हणाले…

229
Konkan Politics : एखाद्याच्या घरात घुसून बेडरूमपर्यंत स्टिंग ?; बावनकुळे भडकले अन् म्हणाले...
  • प्रतिनिधी 

मालवणमध्ये शिवसेना आणि भाजपा स्वतंत्रपणे निवडणूक लढवत असताना, एका धडाकेबाज कारवाईने संपूर्ण राज्यात चांगलीच खळबळ उडवली आहे. २६ नोव्हेंबरच्या मध्यरात्री शिवसेनेचे आमदार निलेश राणे यांनी भाजपा पदाधिकारी विजय किंजवडेकर यांच्या घरावर अचानक धाड टाकली आणि थेट बेडरूममधून हिरव्या पिशवीत ठेवलेले तब्बल २५ लाख रुपये समोर आल्याचा दावा केला. या घटनेनंतर राज्यात राजकीय तापमान चांगलेच वाढले असून राणेंनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे आता मोठ्या वादाला सुरुवात झाली आहे. (Konkan Politics)

भाजपाने हे सर्व आरोप ताबडतोब फेटाळले असतानाच, या वादावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली. निवडणुकीच्या काळात आढळणाऱ्या अशा रकमेची चौकशी अनिवार्य असल्याचे ते म्हणाले. “घरात एवढे पैसे का होते ? कोणत्या व्यवहारातून आले ? कारण काय ?” याची सखोल चौकशी होणे गरजेचे असल्याचे मंत्री बावनकुळे यांनी स्पष्ट केले. निवडणूक आयोग आणि पोलिसांची जबाबदारीही त्यांनी ठळकपणे मांडली. (Konkan Politics)

(हेही वाचा – Leopard Attack : राज्यात 91 बिबटे पकडले; पण पुढे काय? वनविभागासमोर विस्थापनाचा गंभीर प्रश्न)

मात्र मंत्री बावनकुळे यांची सर्वाधिक टीका राणेंच्या पद्धतीवर होती. “एखाद्याच्या घरात थेट शिरून बेडरूमपर्यंत स्टिंग करणे… हे नियमबाह्य आणि अयोग्य,” असे स्पष्ट शब्दांत ते म्हणाले. “राणेंनी हे प्रकरण योग्य पद्धतीने पोलिस किंवा निवडणूक आयोगाच्या लक्षात आणले असते, तर जास्त योग्य झाले असते,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. (Konkan Politics)

२५ लाखांच्या या पिशवीमागचे खरे रहस्य काय ? राणेंचा मध्यरात्रीचा धाडशी ‘बेडरूम स्टिंग’ उघडकीस आणण्यापुरते होते की राजकीय मोर्चेबांधणीचा भाग ? आणि सर्वात महत्त्वाचे या वादाचा मालवणातील आधीच ताणलेल्या राजकीय समीकरणांवर कोणता परिणाम होणार ? या संपूर्ण प्रकरणाचे धागेदोरे आता निवडणूक आयोग आणि पोलिसांच्या चौकशीवरून स्पष्ट होतील… पण सध्या मात्र राज्यातील राजकारणात या ‘२५ लाखांच्या बेडरूम स्टिंग’ची जोरदार चर्चा सुरू आहे. (Konkan Politics)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.