State Commission : राज्य मागासवर्ग आयोगाची पुनर्रचना

अध्यक्षपदी सुनील शुक्रे यांची नियुक्ती

137
State Commission : राज्य मागासवर्ग आयोगाची पुनर्रचना
State Commission : राज्य मागासवर्ग आयोगाची पुनर्रचना
राज्य मागासवर्ग आयोगाचे (State Commission) अध्यक्ष आनंद निरगुडे यांचा राजीनामा मंजूर केल्यानंतर राज्य सरकारने मंगळवारी  या आयोगाची पुनर्रचना केली. त्यानुसार आयोगाच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इतर मागास बहुजन कल्याण विभागाने आज यासंदर्भात  शासन राजपत्र प्रकाशित केले.

मराठा आरक्षणात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या राज्य मागासवर्ग आयोगाच्या (State Commission) सदस्यांनी अलीकडेच राजीनामे दिले आहेत. आयोगाचे सदस्य ॲड. बी. एस. किल्लारीकर आणि  प्रा. लक्ष्मण हाके यांच्या पाठोपाठ आनंद निरगुडे यांनी ४ डिसेंबरला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केला.  शिंदे यांनी त्यांचा  राजीनामा  मंजूर करून तो पुढील कार्यवाहीसाठी मुख्य सचिवांकडे  पाठवला होता. राज्यात मराठा आरक्षणाच्या मागणीने जोर धरला असताना निरगुडे यांनी तडकाफडकी राजीनामा दिल्याने त्याचे पडसाद आज विधानसभेत उमटले होते.

(हेही वाचा-National Medical Council च्या लोगोमध्ये भगवान धन्वंतरीचा फोटो)

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आज तातडीने आयोगाचे अध्यक्ष आणि इतर तीन सदस्यांची नेमणूक केली. आयोगाचे सदस्य म्हणून डॉ. ओमप्रकाश जाधव, डॉ.मारुती शिकारे आणि प्रा. मच्छिंद्र तांबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.