Smriti Irani: “आपल्याला हनुमान बनून कॉंग्रेसची लंका…” स्मृती इराणी यांचा कॉंग्रेसवर हल्लाबोल

131
Smriti Irani:
Smriti Irani: "आपल्याला हनुमान बनून कॉंग्रेसची लंका..." स्मृती इराणी यांचा कॉंग्रेसवर हल्लाबोल

लोकसभा निवडणुकीसंदर्भात केंद्रीय मंत्री (Smriti Irani) आणि भाजप खासदार अनेक दिवसांपासून अमेठीत (Amethi) प्रचार करत आहेत. अमेठी लोकसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात जाऊन जनतेच्या भेटी घेत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात कशाप्रकारे देशाचा विकास झाला? हे जनतेला सांगितले जात आहे. अमेठीतील कार्यक्रमादरम्यान केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांनी कॉंग्रेसवर (Congress) हल्लाबोल केला आहे.

काय म्हणाल्या स्मृती इराणी? (Smriti Irani)

“आम्ही मोदीजींचे हनुमान आहोत आणि आता आम्हाला आमच्या मागण्या घेऊन काँग्रेस पक्षाच्या रूपाने लंकेला आग लावायची आहे. अमेठीसह देशभरात पुन्हा एकदा कमळ फुलेल. राहुल गांधी २६ एप्रिलनंतर अमेठीत येऊन जनतेला पुन्हा फसवतील आणि मोठी स्वप्ने दाखवतील. काँग्रेस पक्षाने गेल्या ५० वर्षात काहीही केले नाही. आता जो विकास आपण अमेठीमध्ये पाहतोय तो कधीच झाला नव्हता.” असं त्या (Smriti Irani) म्हणाल्या.

स्मृती इराणी (Smriti Irani) पुन्हा एकदा मैदानात

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांना भाजपने तिसऱ्यांदा तिकीट दिले आहे. भाजपचा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी स्मृती इराणी (Smriti Irani) पुन्हा एकदा मैदानात उतरल्या आहेत. अमेठीच्या खासदार म्हणून गेल्या ५ वर्षात लोकसभा क्षेत्रात केलेली विकासकामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम त्या सातत्याने करत आहेत. (Smriti Irani)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.