Lok Sabha Election Phase 2: निवडणुकीचा दुसरा टप्पा! शेवटच्या दिवशी राज्यात अनेक नेत्यांच्या प्रचारसभा

121
Lok Sabha Election 2024 : इलेक्ट्रॅानिक आणि सोशल मिडियातील जाहिराती प्रमाणित करून घेणे बंधनकारक - क्षीरसागर

लोकसभेच्या दुसऱ्या टप्प्यात (Lok Sabha Election Phase 2) महाराष्ट्रातील ८ मतदारसंघांसह देशातील ८९ जागांसाठी शुक्रवारी (२६ एप्रिल) मतदान होणार आहे. त्यासाठी सध्या जोरजोराने धडाडणाऱ्या प्रचाराच्या तोफा बुधवारी (२४ एप्रिल ) सायंकाळी थंडावणार आहे. शेवटच्या दिवशी (Lok Sabha Election Phase 2) अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व पक्ष मैदानात उतरले आहेत. (Lok Sabha Election Phase 2)

कोणाची सभा कुठे ?

राज्यातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ- वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणीत २६ एप्रिलला मतदान होत आहे. त्यानिमित्त शेवटच्या दिवशी राज्यात अनेक नेत्यांच्या प्रचारसभा होणार आहे. गृहमंत्री अमित शाह यांची अमरावतीत, तर काँग्रेस नेते राहुल गांधी यांची परतवाडा व सोलापूरमध्ये सभा होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आदी नेत्यांच्या सभा होतील. (Lok Sabha Election Phase 2)

तिसऱ्या टप्प्यात १,३५१ उमेदवार

७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यात ९५ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी (Lok Sabha Election Phase 2) १,३५१ उमेदवार रिंगणात असल्याची माहिती निवडणूक आयोगाने मंगळवारी दिली. तिसऱ्या टप्प्यातील बैतुलसह ९५ जागांसाठी २९६३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीनंतर १५६३ अर्ज वैध ठरविण्यात आले. त्यानंतर सोमवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. महाराष्ट्रात ११ जागांसाठी २५८ उमेदवार रिंगणात आहेत. (Lok Sabha Election Phase 2)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.