Beed Fire Case : बीड जाळपोळ प्रकरणी एसआयटी नेमणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मराठा समाजाच्या आरक्षण मागणीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आंदोलनादरम्यान ३० ऑक्टोबर २०२३ रोजी बीड जिल्ह्यात माजलगाव आणि बीड शहरात काही ठिकाणी जमावाकडून तोडफोड, जाळपोळीच्या घटना घडल्या.

107
Beed Fire Case : बीड जाळपोळ प्रकरणी एसआयटी नेमणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
Beed Fire Case : बीड जाळपोळ प्रकरणी एसआयटी नेमणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

मराठा समाजाच्या आरक्षण मागणीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या आंदोलनादरम्यान ३० ऑक्टोबर २०२३ रोजी बीड जिल्ह्यात माजलगाव आणि बीड शहरात काही ठिकाणी जमावाकडून तोडफोड, जाळपोळीच्या घटना घडल्या. यामध्ये लोकप्रतिनिधींचे निवासस्थाने सुद्धा जाळण्यात आली. तसेच अन्य सार्वजनिक ठिकाणी जाळपोळ करण्यात आली. या दोन्ही शहरातील संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन दिवसात विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी शुक्रवारी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. (Beed Fire Case)

२७८ आरोपींना अटक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यावेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना फडणवीस (DCM Devendra Fadnavis) म्हणाले, माजलगाव आणि बीड येथील घटनेप्रकरणी ज्यांच्याविरुद्ध सबळ पुरावा मिळालेला आहे, त्यांना अटक करण्यात आलेली आहे. आतापर्यंत २७८ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यापैकी ३० आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यावरती मोठे गुन्हे दाखल आहेत. अजूनही माजलगाव प्रकरणात ४० गुन्हेगार आणि बीड प्रकरणात ६१ गुन्हेगार फरार आहेत. त्यांच्या अटकेचे प्रयत्न सुरू आहेत. आरोपींचे मोबाईल लोकेशन, व्हॉट्सॲप मेसेजेस तपासण्यात आले आहे. फरार आरोपी विरोधात देखील सबळ पुरावे पोलिसांकडे आहेत. हा हल्ला पूर्वनियोजित होता का? याबाबतही चौकशी करण्यात येत आहे. हे सर्व प्रकरण सरकारने गांभीर्याने घेतले आहे. (Beed Fire Case)

(हेही वाचा – Police Training Centers : खासगी पोलीस प्रशिक्षण केंद्रांसाठी मार्गदर्शक प्रणाली लागू होणार; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती)

चूक असलेल्या कोणत्याही आरोपीला माफ केले जाणार नाही 

बीड जिल्ह्यातील हा प्रकार अत्यंत गंभीर होता. अशा घटनांना राजकारणापलिकडे जाऊन पाहिले पाहिजे. पोलिसांनी कारवाई केली नसती, तर ही घटना आणखी गंभीर झाली असती. जमाव जास्त आणि पोलिसांची कुमक कमी असल्यामुळे घटनेवर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना कसरत करावी लागली. जमाव हा विखुरलेल्या स्वरूपात वेगवेगळ्या ठिकाणी होता. माजलगाव येथे आधी पोलीस कुमक गेली, त्यानंतर बीड शहरातील घटना सुरू झाली. या घटनेमध्ये चूक नसताना अटक झालेली असल्यास त्यांना बाहेर काढण्यात येईल. मात्र चूक असलेल्या कोणत्याही आरोपीला माफ केल्या जाणार नाही, असा इशाराही फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी यावेळी दिला. (Beed Fire Case)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.