संजय राऊतांना मुंबई पोलिसांचा दणका; ‘जितेंद्र नवलानीं’ची एसआयटी चौकशी केली बंद

99

ईडी अधिका-यांसाठी खंडणी वसूल करत असल्याचा आरोप असलेले जितेंद्र नवलानी यांची एसआयटी चौकशी बंद करण्यात आली आहे. राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात ही माहिती दिली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यावसायिक जितेंद्र नवलानी यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप केले होते.

मुंबईतील व्यावसायिक जितेंद्र नवलानी हे ईडी अधिका-यांच्या नावाचा वापर करुन बिल्डर्सकडून वसुली रैकेट चालवत असल्याचा संजय राऊत यांनी आरोप केला होता. वर्ष 2015 ते 2021 दरम्यान नवलानी यांनी ईडी अधिका-यांच्या नावाचा वापर करत जवळपास 58.96 कोटी खंडणी म्हणून वसूल केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. जितेंद्र नवलानी हे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप करण्यात येत होता.

चौकशी बंद केल्याची दिली माहिती 

संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्याकरता, मुंबई पोलिसांचे एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. या प्रकरणात अॅंटी करप्शन ब्युरोने मे महिन्यात गुन्हा दाखल केला होता. बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती नितीन जमादार आणि न्यायमूर्ती एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी सरकारी वकील अॅड. अरुणा पै यांनी एसआयटी चौकशी बंद करण्यात आल्याची माहिती दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.