Shrikant Shinde : आम्ही एकत्र आलो हे बघवत नाही, म्हणून लावालाव्या करण्याचा प्रयत्न : श्रीकांत शिंदेनी विरोधकांना सुनावलं

गेल्या ११ महिन्यात जेवढी विकासाची कामे झाली ती या पूर्वी कधी झाली नसेल.

83
Shrikant Shinde : आम्ही एकत्र आलो हे बघवत नाही, म्हणून लावालाव्या करण्याचा प्रयत्न : श्रीकांत शिंदेनी विरोधकांना सुनावलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र कल्याण मतदार संघाचे खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. “विरोधकांना दुसरं काही काम उरलेलं नाही. विरोधकांना एकच काम आहे, युतीत वितुष्ट कसं निर्माण होईल.” यांच्यामध्ये लाव्यालावी कश्या करायच्या हेच त्यांचं ध्येय आहे. १९ जूनला शिवसेनेचा वर्धापन दिन आहे. त्यावरही श्रीकांत शिंदे यांनी भाष्य केले आहे.

(हेही वाचा – Heat Wave : विदर्भात पुढील दोन दिवस उष्णतेचा इशारा)

सरकारमध्ये (Shrikant Shinde) सर्व आलबेल आहे. सर्व गोष्टी एकत्रित व्यवस्थितपणे चालू आहेत. चांगल्या प्रकारे चालू आहेत. हे विरोधकांना बघवत नाही. त्यामुळे कुठेतरी या गोष्टी बोलून गोष्टी भडकवतात. पण आमच्यामध्ये सर्व गोष्टी चांगल्या चालू आहेत आणि महाराष्ट्राला पुढे घेऊन जाण्यात विकास करण्याचं काम सुरू आहे. गेल्या ११ महिन्यात जेवढी विकासाची कामे झाली ती या पूर्वी कधी झाली नसेल. त्यामुळे कुणी काहीही केलं तरी आमची युती कायम आहे. त्यात काहीही फरक पडणार नाही, असं म्हणत श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी विरोधकांना सुनावलं आहे.

शिवसेना वर्धापन दिवसावर बोलतांना त्यांनी (Shrikant Shinde) ‘१९ जूनला होणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिनाची तयारी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. मोठ्या संख्येने संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक यावेळी एकत्र येणार आहेत ‘ असे सांगितले.

हेही पहा –

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.