Shrikant Shinde : इतकी वर्षं हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण केले त्यांनी…; श्रीकांत शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान

143
Shrikant Shinde : इतकी वर्षं हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण केले त्यांनी...; श्रीकांत शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
Shrikant Shinde : इतकी वर्षं हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण केले त्यांनी...; श्रीकांत शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान

काश्मीरमध्ये सर्वाधिक पर्यटक महाराष्ट्राचे जातात. सर्वाधिक पर्यटन उत्पन्न काश्मीरला महाराष्ट्रातून मिळते. तिथे महाराष्ट्र सदन बांधण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. महाराष्ट्रातून जाणाऱ्या पर्यटकांना त्याचा लाभ होऊ शकेल. ओमर अब्दुल्लांनी केलेल्या वक्तव्याचा महाराष्ट्रातून निषेध होत आहे. पण ज्या लोकांनी इतकी वर्षं हिंदुत्व आणि मराठी माणसाच्या नावावर राजकारण केलं, अशा लोकांना मला प्रश्न विचारायचाय. ओमर अब्दुल्ला (Omar Abdullah) जेव्हा म्हणाले की, हे महाराष्ट्र सदन कसे काश्मीरमध्ये होते तेच बघतो, तेव्हा त्यांना एका शब्दाने जाब विचारण्याची हिंमत तरी ठेवा, असा टोला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant Shinde) यांनी लगावला आहे.

(हेही वाचा – Loksabha Election 2024 : भाजपकडून हिमाचलमधून कंगना रणौतला उमेदवारी; श्रीरामही निवडणुकीच्या रिंगणात)

सावरकरांबद्दल नकारात्मक बोलणाऱ्या…

जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी रविवारी महाराष्ट्र सदनासंदर्भात केलेल्या एका विधानावरून सध्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. यासंदर्भात रविवार, २५ मार्च रोजी होळीच्या कार्यक्रमानिमित्त कल्याणमध्ये आलेले खासदार श्रीकांत शिंदे यांनी ओमर अब्दुल्ला यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

या वेळी श्रीकांत शिंदे म्हणाले की, अडीच वर्षं तुम्ही सत्तेसाठी लाचारी पत्करली. आता २०२४ ला आपण एकटे न पडता सत्तेत कसे येऊ, या दृष्टीने तुम्ही लाचारी पत्करली आहे. महाराष्ट्रद्वेष ज्यांच्या अंगात भरलेला आहे, अशा ओमर अब्दुल्लांबाबत एक चकार शब्द त्यांनी काढलेला नाही. त्यांना ती हिंमतही होणार नाही. सावरकरांबद्दल नकारात्मक बोलणाऱ्या राहुल गांधींच्या मांडीला मांडी लावून बसण्याचं काम यांनी केले आहे.

काय आहे प्रकरण ?

जम्मू-काश्मीरमध्ये महाराष्ट्र सदन बांधण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहीर केला आहे. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी त्याला विरोध केला आहे. जर काश्मीरमध्ये आपण सत्तेवर आलो, तर महाराष्ट्र सदनाचे बांधकाम थांबवण्यात येईल, असे ओमर अब्दुल्ला म्हणाले होते. (Shrikant Shinde)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.