ईडीच्या अधिका-यांचा जितेंद्र नवलानींशी काय संबंध?

78

जितेंद्र नवलानी या व्यक्तीच्या सात कंपन्यांनी १०० पेक्षा अधिक विकासकांकडून वसुली केली आहे. ईडीने ज्या ज्या कंपन्यांची चौकशी केली आहे, त्या सर्वांनी त्यांचे पैसे जितेंद्र नवलानीच्या कंपनीमध्ये ट्रान्सफर केले आहेत. जितेंद्र नवलानी ईडीच्या अधिकाऱ्यांसाठी काम करत आहेत, असे शिवसेना नेते संजय राऊत पत्रकार परिषद म्हणाले.

ईडीच्या मोठ्या अधिकाऱ्यांचा नवलानींसोबत काय संबंध?

२०१७ मध्ये ईडीने दिवाण हाऊसिंग फायन्सासची चौकशी सुरु केली. अचानक दिवाण हाऊसिंगकडून जितेंद्र नवलानीच्या खात्यात २५ कोटी ट्रान्सफर झाले. मग ३१ मार्च २०२० पर्यंत एसआर वाधवान यांच्या कंपनीकडून नवलानींच्या कंपनीमध्ये आणखी १५ कोटी रुपये ट्रान्सफर झाले. याचप्रकारे अविनाश भोसलेंची चौकशी झाली. त्यानंतर अविनाश भोसलेंकडून १० कोटी रुपये नवलानीच्या सात कंपनीमध्ये ट्रान्सफर केले गेले. ईडीची चौकशी सुरु होताच, नवलानींच्या कंपन्यांमध्ये १६ कोटी रुपये ट्रान्सफर झाले. ईडीच्या सर्वात मोठ्या अधिकाऱ्यांचा नवलानींसोबत काय संबंध आहे? आणि पैसे ट्रान्सफर का होत आहेत?, असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.

(हेही वाचा ईडी म्हणजे भानामती, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर धाडी पडतील!)

किरीट सोमय्यांवर नवे आरोप

किरीट सोमय्या हे महान महात्मा सर्वाच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर काढतात. तो त्यांचा छंद आहे. सोमय्या हे एचडीआयएल, पत्राचाळ प्रकरणाबद्दल बोलत आहेत. जून २०१५ मध्ये किरीट सोमय्या यांनी एचडीआयएल आणि जीव्हीके कंपनीने मुंबई विमानतळाची ६३ एकर जमीन हडपल्याचा आरोप केला होता. त्यासाठी एमएमआरडीमध्ये किरीट सोमय्या यांनी सातत्याने तक्रारी केल्या. ऑक्टोबर २०१५ मध्ये किरीट सोमय्या यांनी एमएमआरडीएला पत्र लिहिले होते. यामध्ये एचडीआएल कंपनीला १ कोटी चौरस फूट व्यावसायिक जमीन गिफ्ट म्हणून दिल्याचा आरोप केला होता. या जमिनीची किंमत ५००० कोटी रुपये असल्यामुळे या घोटाळ्याची चौकशी व्हावी, असेही किरीट सोमय्या यांनी म्हटले होते. त्यानंतर किरीट सोमय्या सातत्याने एकापाठोपाठ एक तक्रारी करत होते. त्यावेळी किरीट सोमय्या खासदार होते. पण त्यांनी या सगळ्याविरोधात एकदाही केंद्रीय तपासयंत्रणेकडे तक्रार केली नाही, असेही राऊत म्हणाले.

सोमय्यांनी राकेश वाधवानांना केले ब्लॅकमेल  

त्यानंतर २०१६ मध्ये किरीट सोमय्या यांनी एचडीआयएल आणि राकेश वाधवान यांच्याविरोधात अचानक तक्रार करणे बंद केले. त्यानंतर १ डिसेंबर २०१६ रोजी नील सोमय्या यांची निकॉन इन्फ्रास्ट्रक्चरच्या संचालकपदी वर्णी लागली. त्यानंतर निकॉन इन्फ्रास्ट्रक्टरला ५,१६८ स्क्वेअर फूट क्षेत्रफळ विकसित करण्याचे अधिकार मिळाले. हे अधिकार राकेश वाधवान यांच्याकडून विकत घेण्यात आले होते. किरीट सोमय्या यांचा फ्रंटमॅन देवेंद्र लधानी यांच्या साई रिधम कंपनीच्या माध्यमातून अनेक व्यवहार झाले. वसईमध्ये साई रिधम कंपनीच्या जमिनीवर निकॉन इन्फ्रास्ट्रक्चरला दोन प्रकल्प उभारण्याची परवानगी मिळाली. या जमिनीचे मूळ मालक राकेश वाधवान होते. पीएमसी बँक घोटाळाप्रकरणात किरीट सोमय्या यांनी इतके आरोप केले असतानाही त्यांच्या मुलाचे राकेश वाधवान यांच्या कंपनीशी संबंध कसे असू शकतात? किरीट सोमय्या यांनी पीएमसी बँक घोटाळ्यात राकेश वाधवान यांना ब्लॅकमेल करून ही जमीन मिळवून दिली होती का? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.

(हेही वाचा ईडीचे ४ अधिकारी गजाआड जाणार! संजय राऊतांनी काय केला गौप्यस्फोट?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.